• Download App
    Tokyo Olympic : भारतीय हॉकीचं दमदार कमबॅक ; स्पेनवर ३-० ने मात ; पेनल्टी कॉर्नरचा पुरेपुर वापर - रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो। Tokyo Olympics: Strong comeback of Indian hockey

    Tokyo Olympic : भारतीय हॉकीचं दमदार कमबॅक ; स्पेनवर ३-० ने मात ; पेनल्टी कॉर्नरचा पुरेपुर वापर – रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो

    टीम इंडियानं स्पेनला धूळ चारली- भारतानं केलेले तीनही गोल हे पेनल्टी कॉर्नर, पेनल्टी स्ट्रोक, आणि फिल्डचा पुरेपूर वापर


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना १-७ ने गमावल्यानंतर भारताने स्पेनवर ३-० ने मात केली आहे. रुपिंदरपाल सिंग आणि सिमरनजीत सिंग यांनी केलेल्या गोलच्या आधारावर भारताने या सामन्यात विजय मिळवला. Tokyo Olympics: Strong comeback of Indian hockey

    या विजयामुळे ग्रुप ए मध्ये (Group A) भारताचं स्थान काहीसं मजबूत झालंय. ऑस्ट्रेलियानंतर भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष स्पेनविरोधात भारताचा खेळ पूर्णपणे बदलेला दिसला. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना डिफेन्स आणि फॉरवर्ड दोन्ही गायब होते, स्पेनविरोधात मात्र त्यांनीच कमाल केली. पेनल्टी स्ट्रोक, पेनल्टी कॉर्नरचा उत्तम वापर केला.



    संपूर्ण सामन्यात भारताने स्पेनवर दबाव ठेवत विजयाचं पारडं आपल्या बाजूलाच झुकलं होतं. इतकच नव्हे तर भारताच्या बचावफळीनेही आज स्पेनचे सर्व हल्ले परतवून लावत भारतीय गोलपोस्ट सुरक्षित ठेवली. सामन्याच्या पहिल्या सत्रात आठव्या मिनीटाला सिमरनजीत सिंगला गोल करण्याची संधी होती. परंतू ती वाया गेली. यानंतर स्पेननेही भारताच्या गोलपोस्टवर हल्ले चढवले पण श्रीजेश आणि भारताच्या बचावफळीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. अखेरीस सिमरनजीतने १४ व्या मिनीटाला मैदानी गोल करत भारताला खातं उघडून दिलं.

    दुसऱ्या सत्रातही भारताने आपलं आक्रमण कायम ठेवलं. रुपिंदरपालने या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोनं करत भारताची आघाडी २-० ने वाढवली. या सत्रातही भारतीय बचावफळीने स्पेनचे सर्व हल्ले परतवून लावले. अखेच्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नवर आणखी एक संधी मिळाली, ज्यावर गोल करत रुपिंदरपालने भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

    भारत आणि स्पेनमधल्या विजेत्याचा निकाल चौथ्या क्वार्टरनंतर लागला. तसं तर पहिल्याच क्वार्टरमध्ये विजयी कोण होणार हे निश्चित झालं होतं. कारण भारतानं ह्या सामन्यात वेगवान हॉकीचं प्रदर्शन केलं. त्याचाच फायदा भारताला झाला.

    Tokyo Olympics: Strong comeback of Indian hockey

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!