• Download App
    पी. व्ही. सिंधू, भारतीय हॉकीचा टोकियोत जलवा; दोघांनी जपानला त्यांच्याच भूमीत नमविले Tokyo Olympics: Sindhu defeats Yamaguchi, storms into semis

    पी. व्ही. सिंधू, भारतीय हॉकीचा टोकियोत जलवा; दोघांनी जपानला त्यांच्याच भूमीत नमविले

    वृत्तसंस्था

    टोकियो – टोकियो ऑलिंपिंकमध्ये शुक्रवारचा दिवस भारतीयांसाठी लकी ठरला. शटल राणी पी. व्ही. सिंधूने आपल्या जपानी प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्यफेरीत गेली. तर पुरूष हॉकीत भारताने जपानच्या भूमीत जपानचाच पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतले आपले स्थान पक्के केले. Tokyo Olympics: Sindhu defeats Yamaguchi, storms into semis

    पी. व्ही सिंधू बॅडमिंटनमध्ये आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊले दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.

    महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन चीनी खेळाडू चेन युफेई आणि ही बिंगझाओ यांच्यात सामना होईल. ही बिंगजाओने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. चेन युफेईने कोरियाच्या एन से यंगचा पराभव केला. पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉर्म कायम राखून उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज विजय मिळविला. सिंधूच्या नव्या शैलीसमोर यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.

    त्यामुळे शुक्रवारचा आजचा ३० जुलैचा दिवस भारतासाठी चांगला ठरला. बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने देशासाठी दुसरे पदक निश्चित केले तर बॅडमिंटनमध्ये सिंधूने उपांत्य फेरी गाठली.

    हॉकी टर्फकडून भारतासाठी एक चांगली बातमी आली, जिथे पहिल्या महिला संघाने आयर्लंडचा पराभव करून पहिला विजय नोंदवला आणि आशा जिवंत ठेवल्या. त्याचवेळी, भारतीय पुरुष संघाने जपानला त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात ५-३ ने पराभूत आणि गट टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसरे स्थान कायम राखले. भारतीय संघाने याआधीच उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले आहे आणि जपानला पराभूत करून चांगल्या पद्धतीने गट चरण पूर्ण केला आहे.

    Tokyo Olympics: Sindhu defeats Yamaguchi, storms into semis

    Related posts

    Modi : मोदी म्हणाले- पाटणा पुण्यासारखे, मोतीहारी मुंबईसारखी होईल; गयाजीमध्ये गुरुग्रामसारखे रोजगार मिळतील

    Bhupesh Baghel :दारू घोटाळ्यात माजी सीएम भूपेश बघेल यांच्या मुलाला अटक

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- NIA खटल्यांच्या सुनावणीसाठी स्पेशल कोर्ट असावे, अन्यथा अंडरट्रायल आरोपींना जामीन द्यावा लागेल!