• Download App
    Tokyo Olympics : वंदनाने रचला इतिहास, 41 वर्षांनी महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत, आता लढत ऑस्ट्रेलियाशी । Tokyo Olympics Indian Women Hockey Team Qualifies For Quarterfinals After Great Britain Defeat Ireland 2-0 In Last Pool A Match

    Tokyo Olympics : वंदनाच्या हॅटट्रिकने केली कमाल, 41 वर्षांनी हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, आता लढत ऑस्ट्रेलियाशी

    Tokyo Olympics :  भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे, आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. खरंतर, पूल ए सामन्यात ब्रिटनने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. यामुळे भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वंदनाच्या शानदार खेळामुळे भारतीय संघ अ गटातील आपला शेवटचा सामना जिंकू शकला आणि उपांत्यपूर्व फेरीच्या आशा जिवंत राहिल्या. Tokyo Olympics Indian Women Hockey Team Qualifies For Quarterfinals After Great Britain Defeat Ireland 2-0 In Last Pool A Match


    वृत्तसंस्था

    टोकियो : भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे, आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. खरंतर, पूल ए सामन्यात ब्रिटनने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. यामुळे भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वंदनाच्या शानदार खेळामुळे भारतीय संघ अ गटातील आपला शेवटचा सामना जिंकू शकला आणि उपांत्यपूर्व फेरीच्या आशा जिवंत राहिल्या.

    भारतीय संघाने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव केला. यासह भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसरा विजय मिळवला आणि सहा गुणांसह गट अ मध्ये चौथे स्थान मिळवले. या विजयानंतर भारताची नजर आयर्लंड आणि ग्रेट ब्रिटनच्या सामन्यावर होती. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी आयर्लंडचा पराभव होणे आवश्यक होते. आणि घडलेही तसेच.

    आता 2 ऑगस्टला भारतीय हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ भिडतील. भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याआधी भारतीय महिला संघाची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये होती, जिथे त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती, पण शेवटी त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

    वंदनाने हॅटट्रिक करून रचला इतिहास

    भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू वंदना कटारिया हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने तीन गोल केले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह वंदना हॉकीमध्ये हॅटट्रिक करणारी ऑलिम्पिक इतिहासातील पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. 1984 नंतर ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही भारतीयाने हॅटट्रिक केली नाही. यापूर्वी 1984च्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीपटू विनीत शर्मा यांनी गोलची हॅटट्रिक केली होती. त्यांनी मलेशियाविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली आणि भारताने 3-1 असा सामना जिंकला होता.

    Tokyo Olympics Indian Women Hockey Team Qualifies For Quarterfinals After Great Britain Defeat Ireland 2-0 In Last Pool A Match

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!