• Download App
    Tokyo Olympics : कुस्तीमध्ये भारताला धक्का, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पैलवान विनेश उपांत्यपूर्व फेरीत पराभूत । Tokyo Olympics 2021 Vinesh Phogat Number 1 Seed Wrestler Loses To Belarus Vanesa By 3-9 In The Women 53kg Quarterfinal

    Tokyo Olympics : कुस्तीमध्ये भारताला धक्का, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पैलवान विनेश उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

    भारताला कुस्तीमध्ये धक्का बसला आहे. भारताची जागतिक क्रमवारीतील पहिलवान कुस्तीपटू विनेश फोगाट महिलांच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. विनेशला बेलारूसची कुस्तीपटू व्हेनेसा कलाडझिंस्काया हिने पराभूत केले. या पराभवानंतरही विनेश पदक जिंकण्याच्या शर्यतीत कायम आहे. आता तिला रेपचेज सामन्याची वाट पाहावी लागेल. पण विनेशचा पराभव भारतासाठी धक्कादायक आहे. Tokyo Olympics 2021 Vinesh Phogat Number 1 Seed Wrestler Loses To Belarus Vanesa By 3-9 In The Women 53kg Quarterfinal


    विशेष प्रतिनिधी

    टोकियो : भारताला कुस्तीमध्ये धक्का बसला आहे. भारताची जागतिक क्रमवारीतील पहिलवान कुस्तीपटू विनेश फोगाट महिलांच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. विनेशला बेलारूसची कुस्तीपटू व्हेनेसा कलाडझिंस्काया हिने पराभूत केले. या पराभवानंतरही विनेश पदक जिंकण्याच्या शर्यतीत कायम आहे. आता तिला रेपचेज सामन्याची वाट पाहावी लागेल. पण विनेशचा पराभव भारतासाठी धक्कादायक आहे.

    भारताची पदकाची दावेदार विनेश फोगटने 53 किलो वजनी गटातील पहिल्या फेरीत रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती स्वीडनच्या सोफिया मॅटसनला हरवून अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. विनेशला अजूनही पदक जिंकण्याची संधी आहे. जर बेलारुसची कुस्तीपटू व्हेनेसा अंतिम फेरीत पोहचली, तर विनेशला रेपचेजमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

    तत्पूर्वी, विनेशने आपल्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. 26 वर्षीय भारतीय कुस्तीपटूने स्वीडिश खेळाडू सोफियाचा 7-1 असा पराभव केला. विनेशने 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यानही मॅटसनला हरवले होते.

    मॅटसनने जेव्हाही सामन्यादरम्यान विनेशच्या उजव्या पायावर हल्ला केला तेव्हा तिने प्रत्युत्तर देत गुण मिळवले. विनेश फोगटने संपूर्ण सामन्यात उत्साह आणि प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याची संधीही तयार केली होती.

    Tokyo Olympics 2021 Vinesh Phogat Number 1 Seed Wrestler Loses To Belarus Vanesa By 3-9 In The Women 53kg Quarterfinal

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य