• Download App
    Tokyo Olympic 2020 : भारतीय हॉकीची घौडदौड ; स्पेननंतर अर्जेंटिनाचाही धुव्वा ; आता गाठ जपानसोबत। Tokyo Olympics 2020: Indian Hockey Race; Washed Argentina after Spain; Now with Japan

    Tokyo Olympic 2020 : भारतीय हॉकीची घौडदौड ; स्पेननंतर अर्जेंटिनाचाही धुव्वा ; आता गाठ जपानसोबत

    रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाला भारताने हरवलं.


    भारताने 3-1 ने सामना जिंकला शेवटच्या क्षणी मिळालेल्या कॉर्नरवरुन हरमनप्रीत सिंगने भारतासाठी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला 3-1 ने पराभूत केलं Tokyo Olympics 2020: Indian Hockey Race; Washed Argentina after Spain; Now with Japan


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घौडदौड कायम राहिलेली आहे. भारताने दमदार कमबॅक करत स्पेनला हरवलं. यानंतर आज झालेल्या सामन्यात भारताने अर्जेंटिनाचाही 3-1 ने पराभव केला. दोन्ही संघांमधला सामना खऱ्या अर्थाने अटीतटीचा झाला. मध्यांतरापर्यंत एकही संघ गोल करण्यात अपयशी ठरला.

    तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवली. अखेरीस पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोनं करत वरुण कुमारने 43 व्या मिनीटाला गोल करत कोंडी फोडली. परंतू भारताची ही आघाडी फारकाळ टिकू शकली नाही. अर्जेंटिनाकडून स्कूथ कॅसेलाने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली.



    सामना 1-1 अशा बरोबरीत सुटणार असं वाटत असतानाच 58 व्या मिनीटाला भारतीय खेळाडूंनी अर्जेंटिनाचा बचाव भेदत पेनल्टी एरियात प्रवेश केला. विवेक सागर प्रसादने गोल करत भारताला 2_1 अशी आघाडी मिळवून दिली.

    अखेरच्या क्षणांमध्ये झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिनाचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. 59 व्या मिनीटाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक संधी मिळाली. ज्यात हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताची आघाडी 3_1ने करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना जपानसोबत होणार आहे.

    Tokyo Olympics 2020: Indian Hockey Race; Washed Argentina after Spain; Now with Japan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट