Tokyo Olympics 2020 Live Updates : टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचा आज सातवा दिवस आहे.
41 मिनिटांत सामना जिंकला, क्वार्टरफायनलध्ये पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटांत हा सामना संपला. सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
आगामी फेरीत सिंधूसमोर खडतर आव्हान, बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा कायम Tokyo Olympic: P.V.Sindhu hits the quarterfinals: defeats Denmark; Attention to the medal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपूट पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड्टवर दोन सेटमध्ये सरळ मात करत सिंधूने बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा कायम ठेवली. अवघ्या 41 मिनीटांत संपलेल्या या सामन्यात सिंधूने 21-15, 21-13 अशी बाजी मारली.
आगामी फेरीत सिंधूसमोरचं आव्हान : जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाच्या किम गेउन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी सिंधूला दोन हात करायचे आहेत.
संपूर्ण सामन्यावर सिंधूचं वर्चस्व पहायला मिळालं. ड्रॉप, स्मॅश अशा चांगल्या फटक्यांचा वापर करत सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याला कायम बॅकफूटवर ठेवलं. संपूर्ण सामन्यात डेन्मार्कची मिया दबावाखाली खेळताना आढळली. सिंधूच्या रुपाने बॅडमिंटनमध्ये भारताची एकमेश आशा कायम आहे.