जाणून घ्या, पंतप्रधा मोदी नेमकं काय म्हणाले आहेत?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या 108 व्या भागात देशाला संबोधित केले. मोदींनी आज फिट इंडिया सारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.Todays episode of Mann Ki Baat program was important for Modi
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आज आत्मनिर्भर आहे. लोकल फॉर वोकलवर नागरिकांडून भर दिला जात असल्याचे दिवाळीच्या काळात केलेल्या व्यवसायाने सिद्ध केले. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे स्मरण करून ते म्हणाले की, या मोहिमेद्वारे आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी देशाचा गौरव केला आहे. त्याचबरोबर क्रीडा विश्वात आपल्या देशातील खेळाडू आणि क्रिकेटपटूंनी देशवासीयांची मने जिंकली.
मोदी पुढे म्हणाले, आज आपल्या संयुक्त प्रवासाचा 108 वा भाग आहे. 108 क्रमांकाचे महत्त्व आणि त्याचे पावित्र्य हा येथे सखोल अभ्यासाचा विषय आहे. जपमाळातील 108 मनी, 108 वेळा जप, 108 दिव्य गोल, मंदिरात 108 पायऱ्या, 108 घंटा… ही 108 संख्या अनंत श्रद्धेशी संबंधित आहे. म्हणूनच मन की बातचा 108 वा भाग माझ्यासाठी अधिक खास झाला आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, “140 कोटी भारतीयांच्या बळावरच या वर्षात आपल्या देशाने अनेक विशेष यश संपादन केले आहे. आज भारताचा प्रत्येक कोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने, आत्मनिर्भरतेच्या भावनेने 2024 मध्येही आपल्याला हाच उत्साह आणि गती कायम ठेवायची आहे.”
Todays episode of Mann Ki Baat program was important for Modi
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द
- विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ
- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंचा पलड़ा पवारांवर भारी; पवारांच्या “राष्ट्रीय” राजकारणाची ही तर खरी “बारामती श्री”!!
- रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू