विशेष प्रतिनिधी
दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ७६ ते ८५ पैशांनी, तर डिझेलच्या दरातही ६७ ते ७५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरातही ८० पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. Today again petrol, diesel became more expensive
या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे : मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे.
तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत ते जाणून घ्या, तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL वेबसाइटवरून मिळेल.
मुंबईत पेट्रोलच्या दरात ८४ पैशांनी तर डिझेलच्या दरात ८५ पैशांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात ८४ पैशांनी, तर डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात ७५ पैशांनी, डिझेलच्या दरात ७६ पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
Today again petrol, diesel became more expensive
महत्त्वाच्या बातम्या
- वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; ऊर्जा मंत्र्यांसमवेत सकारात्मक बैठक!!
- Modi – Memon – Pawar : माजिद मेमन यांची मोदींवर स्तुतिसुमने; पण पवारांचे प्रश्न टाळून निघून जाणे!!
- कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील -येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार
- अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता