• Download App
    जाट समाजाला जोडण्यासाठी अमित शहा यांनी घेतली सामाजिक बंधुता बैठक, २५० हून अधिक जाट नेत्यांची उपस्थिती|To unite the Jat community, Amit Shah held a social fraternity meeting, attended by more than 250 Jat leaders

    जाट समाजाला जोडण्यासाठी अमित शहा यांनी घेतली सामाजिक बंधुता बैठक, २५० हून अधिक जाट नेत्यांची उपस्थिती

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशातील जाट समाज भाजपवर नाराज असल्याच्या कथित आरोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. शहा यांनी घेतलेल्या सामाजिक बंधुता बैठकीला २५० हून अधिक जाट नेते उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनाही साद घातली आहे.To unite the Jat community, Amit Shah held a social fraternity meeting, attended by more than 250 Jat leaders

    उत्तर प्रदेशात विधानसभानिवडणुकीची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशातून होणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात जाट व्होट बँकेचा मोठा प्रभाव आहे. भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त २५० हून अधिक जाट समाजातील लोकांशी संवाद साधला. या सभेला सामाजिक बंधुता बैठक असं संबोधण्यात आलं होतं.



    यावेळी संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातूनच तिन्ही राष्ट्रीय निवडणुकांमध्ये जाट समाजानं भाजपची खूप मदत केली आहे आणि विजयही मिळवून दिला. जाट आणि भाजपमध्ये अनेक साम्य आहे. भाजप आणि जाट राज्याच्या प्रगतीचा आणि शेतकऱ्यांचा विचारही करतात.

    दोघेही देशाच्या सुरक्षेचाही विचार करतात. वन रँक वन रँक पेन्शन देण्याचे काम आम्ही वषार्नुवर्षे केले. जाट प्रवगार्तूनच भाजपने तीन राज्यपालही दिले आणि ९ जणांना खासदार केलं. चौधरी चरणसिंग यांच्यानंतर सर्वाधिक आम्ही दिले आहे.

    शहा म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांचे ३६ हजार कोटी माफ केले. उसाच्या पैशांबद्दल थोडीफार उणीव असेल ती लवकरच दूर केली जाणार आहे. मात्र, राहुल गांधींना खरीप आणि रबी पिकांमधला फरकही माहित नाही. अखिलेश यादव सरकारदरम्यान ४२ ऊस कारखाने होते, पण त्यापैकी२२ बंद करण्यात आले. योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेशात एकही हिंसाचार झाला नाही.

    राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांना आवाहन करताना शहा म्हणाले, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाचे सरकार बनले तर जयंत चौधरी यांचे नाही, तर अखिलेश यांचंच चालेल. तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात. मला कधीही फटकारा पण भाजपला मत द्या. मी पुन्हा सांगतो जयंत यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे.

    आता काही होऊ शकत नाही. परंतु २०२४ साठी त्यांना समजवा. जर कोणताही वाद असेल तर सोबत बसून सोडवू, बाहेरून कोणालाही बोलावण्याची गरज नाही. समाजाचे लोक त्यांच्याशी बोलतील, समजावतील. भाजपचा दरवाजा त्यांच्यासाठी कायमच खुला आहे. त्यांनी आमच्याकडे यावे असे आम्हाला वाटत आहे.

    To unite the Jat community, Amit Shah held a social fraternity meeting, attended by more than 250 Jat leaders

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!