• Download App
    अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुळाशी जाण्यासाठी 'ईडी'ने कंबर कसली; सूत्रधारांचा छडा लावण्यासाठी मनी लॉड्रिंग व्यवहाराचा कसून तपास करणार|To get to the root of drug trafficking ‘ED’ tightened the waist; The money laundering transaction will be thoroughly investigated to crack down on the facilitators

    अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुळाशी जाण्यासाठी ‘ईडी’ने कंबर कसली; सूत्रधारांचा छडा लावण्यासाठी मनी लॉड्रिंग व्यवहाराचा कसून तपास करणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून भारतात आणलेल्या सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या ड्रग तस्करी रॅकेटचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी डीआरआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लाँडरिंग अंतर्गत अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईची तयारी करत आहे.To get to the root of drug trafficking ‘ED’ tightened the waist; The money laundering transaction will be thoroughly investigated to crack down on the facilitators

    गुजरात येथील मुंद्रा बंदरावर उतरविलेल्या मालात तब्बल ३ हजार किलोग्रॅम अंमली पदार्थ सापडले होते. ते १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तान येथून इराणला आणि तेथून गुजरात येथे पाठविण्यात आले होते. या ड्रग्स तस्करीत तालिबानशी संबंधित दोन अफगाणी नागरिकांना ग्रेटर नोएडा येथून अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.



    उच्च अधिकाऱ्यांच्या सूत्रानुसार यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या तस्करीचे संकेत मिळत होते. आंध्र प्रदेशातील विजयवाड़ा येथी आशी कंपनीच्या नावे टाल्कम पावडरच्या आडून ड्रगची खेप पाठविण्यात आली होती. त्यांच्या नावे जूनमध्ये २५ हजार किलो टाल्कम पावडर आयात केली होती. ती पावडर सुद्धा ड्रग्जच होती, असा अंदाज आहे. त्याची किंमत ७० हजार कोटी पेक्षा अधिक होती.

    एवढ्या मोठ्या तस्करीच्या मागे मोठे जाळे असण्याची दाट शक्यता आहे. हे काम एखादं दुसऱ्या व्यक्तीचे नाही. तस्करी करून त्याची विक्री करणारी मोठी टोळी या मागे असावी, असा कयास सूत्रांचा आहे. आता या जाळ्याचा बुरखा फाडणे महत्वाचे आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

    या धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या काळ्या संपत्तीचा पत्ता शोधणे आणि ते जप्त करण्याचे काम करणे आवश्यक आहे. या प्रकरणात मनी लोंड्रींगची चौकशी महत्वाची ठरणार आहे. कारण तस्करीसाठी पाठविलेली कोट्यवधींची रक्कम थेट तालिबानी दहशतवाद्यापर्यंत पोचली आहे. ती कशी पोचली ? त्याचे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध आता ईडी घेणार आहे.

    काळा पैसा अफगाणिस्तानपर्यंत पोचविण्यासाठी विजयवाडा येथील आशी ट्रेंडिंग कंपन्यासारख्या अन्य खोट्या कंपन्यांचा वापर हवालासाठी केला गेला आहे.डीआरआयचे वरिष्ठ अधिकारी यांच्या नुसार ग्रेटर नोएडा येथून अटक केलेल्या अफगाणी नागरिक आणि अन्य आरोपींची चौकशी सुरु आहे.

    त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सर्व माहिती हाती आल्यावर याबाबत अधिक माहिती देता येईल. तसेच या प्रकरणी येत्या काही दिवसात आणखी काही जणांना अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

    To get to the root of drug trafficking ‘ED’ tightened the waist; The money laundering transaction will be thoroughly investigated to crack down on the facilitators

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली