• Download App
    भाजपची दिशा बूथ विजयाकडे; काँग्रेसची दिशा संघ कार्यपद्धती कडे...!! |To counter BJP, Cong creating RSS-style cadre-based army in UP

    भाजपची दिशा बूथ विजयाकडे; काँग्रेसची दिशा संघ कार्यपद्धती कडे…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात राजकीय घमासान सुरू झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपापली निवडणूक रणनीती ठरविली आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील आपला विजय टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक बूथमध्ये बहुमत म्हणजे विजय अशी दिशा निश्चित केली आहे, तर काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कॅडर पद्धत अवलंबून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारसरणीशी निष्ठावंत राहण्याचे धडे देणे सुरू केले आहे.To counter BJP, Cong creating RSS-style cadre-based army in UP

    उत्तर प्रदेशाची निवडणूक प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वासाठी प्रतिष्ठेची झाल्याने काँग्रेसने संघाची कार्यपद्धती अवलंबत आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. या प्रशिक्षणाची जबाबदारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे सल्लागार राजेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.



    त्यांना काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख पत्रकार विनोद वर्मा आणि संघटनात्मक पातळीवर माजी पंतप्रधान अटल बिहारी यांची पुतणी करुणा शंकर शुक्ला हे मदत करणार आहेत. उत्तर प्रदेशात भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष यांच्या खालोखाल काँग्रेसचा नंबर लागतो. एकेकाळी काँग्रेस पक्ष सर्वव्यापी होता, तो आता चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी संघाची कार्यपद्धती अवलंबली आहे.

    संघ आपल्या कार्यकर्त्यांना विविध पातळ्यांवर विविध प्रशिक्षणे देऊन तयार करत राहतो. ही निरंतर प्रक्रिया संघात चालते. परंतु आता काँग्रेसने निदान 2022 उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यापुरती ही पद्धत अवलंबण्याचे ठरविले आहे. छत्तीसगडमध्ये ग्रामपंचायत पातळीपर्यंत काँग्रेसचे कॅडर राजेश तिवारी यांनी मजबूत करून दाखविले म्हणून त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे केडर मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज भाजपच्या विजयी अभियानाची घोडदौड आता प्रत्येक बुथ पातळीपर्यंत नेण्याची सुरुवात केली आहे. भाजपने या अभियानाला बूथ विजय अभियान असे नाव दिले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत आहेच आगामी निवडणुकीच्या सर्वेमध्ये सुद्धा भाजपला बहुमत मिळेल असेच म्हणण्यात आले आहे.

    परंतु हा विजय अधिक दृढमूल करण्यासाठी प्रत्येक बुथवर म्हणजे प्रत्येक एक हजार मतदानांपैकी पाचशेपेक्षा अधिक मते म्हणजे प्रत्येक बुथवर भाजपला बहुमत हवे आहे. यामुळे भाजपचा विजय अधिक दृढमूल होईल असा विश्वास जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे.

    To counter BJP, Cong creating RSS-style cadre-based army in UP

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य