• Download App
    स्वातंत्र्य लढ्याच्य स्मृति पर्यटनस्थळाच्या रुपाने जपणार, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमिति ७५ स्थळांचा होणार विकास|To commemorate the freedom struggle as a tourist destination, 75 places will be developed on the occasion of Independence Day

    स्वातंत्र्य लढ्याच्य स्मृति पर्यटनस्थळाच्या रुपाने जपणार, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमिति ७५ स्थळांचा होणार विकास

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पुढच्या वर्षी साजरा होत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ठिकाणांच्या स्मृति चिरंतनपणे जपल्या जाव्यात यासाठी ७५ ठिकाणे पर्यटनस्थळाच्या रुपाने जपली जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पर्यटन विभागाने अशा ७५ ठिकाणांची निवड केली आहे, जी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आहेत.To commemorate the freedom struggle as a tourist destination, 75 places will be developed on the occasion of Independence Day

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात केंद्र आणि राज्य सरकारे या ७५ ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी सुविधा उपलब्ध करतील.महाराष्ट्रातील वर्धा, अहमदाबादचे साबरमती यांच्यासह १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र असलेले मीरत अंदमान, कोलकाता, नागालँडमधील मोकाकचुंग, मणिपूर येथील मोइरांग आणि ओडिशातील कटक या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.



    स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक नुकतीच झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय पर्यटन मंत्री जी. कृष्ण रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मंत्र्यांनी याबाबत आपल्या सूचना केल्या.

    नेताजी सुभाषचंद्र बोस यांना यामध्ये अनोखी श्रध्दांजली वाहिली जाणार आहे. नेताजींशी संबंधित तीन सर्किट बनविण्यात आले आहेत. यातील पहिला दिल्ली-मेरठ- डलहौसी, दुसरा कोलकाता ते नागालँडच्या रुजज्हो गावापर्यंत आणि तिसरा ओडिशाच्या कटकपासून प. बंगालच्या कोलकातापर्यंत व पुढे अंदमानपर्यंत असणार आहे. हा प्रवास चार दिवसांत पूर्ण होईल. नेताजींची १२५ वी जयंतीही याच वर्षी आहे. या ठिकाणांचा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतही विचार सुरू आहे.

    To commemorate the freedom struggle as a tourist destination, 75 places will be developed on the occasion of Independence Day

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य