• Download App
    जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी पंतप्रधान मोदींबरोबर शेअर केलेल्या अनुभवांचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचीत प्रतिबिंब TN's taxi ambulance, Rajasthan's mobile OPD, oxygen nurses of Kerala, among India's best COVID practices

    जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी पंतप्रधान मोदींबरोबर शेअर केलेल्या अनुभवांचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचीत प्रतिबिंब

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध राज्यांमधील प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी यांच्याशी संवाद साधत आहेत. यामध्ये स्थानिक पातळीवर शोधलेल्या अनोख्या उपाययोजना केंद्र सरकारला शेअर करायलाही सांगत आहेत. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आणि महापालिका आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वेगळे प्रयोग केले आहेत. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक उपाययोजनांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडताना दिसत आहे. TN’s taxi ambulance, Rajasthan’s mobile OPD, oxygen nurses of Kerala, among India’s best COVID practices

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांना ताज्या मार्गदर्शक सूचना अमलात आणण्यासंबंधी पत्र लिहिले आहे. या पत्रात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पंतप्रधान मोदींबरोबर शेअर केलेल्या काही उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये तामिळनाडूतील टॅक्सी अँब्युलन्स, राजस्थानमधील मोबाईल ओपीडी, केरळमधील ऑक्सिजन नर्स आदी उपक्रमांचा समावेश आहे. हे उपक्रम त्या राज्यांमध्ये यशस्वी झाले असून त्यांचे अनुकरण इतर राज्यांनाही करता येईल, असे पत्रात सूचित करण्यात आले आहे.

    राजस्थानात मोबाईल ओपीडीच्या उपक्रमाद्वारे नॉन कोविड पेशंटना सेवा देण्यात येते, तर बिकानेरमध्ये ऑक्सिजन मित्र हा उपक्रम यशस्वी झाला आहे. ऑक्सिजनचा योग्य आणि सुरक्षित वापरावर ऑक्सिजन मित्र भर देतात.

    केरळच्या छोट्या आणि मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन नर्स कार्यरत आहेत. त्या देखील ऑक्सिजनचा योग्य आणि सुरक्षित वापराचा जागीच सल्ला देतात. त्यातून ऑक्सिजनची बचत आणि त्याचा योग्य ठिकाणी उपयोग होताना दिसतो.

    उत्तर प्रदेशात लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी ग्रामीण भागात ७५००० केंद्रे उघडली जातील. ती सगळ्या राज्याचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहेत. काशीमध्ये कोविडसंबंधी सगळी माहिती देणारी कोविड रिस्पॉन्स टीम कार्यरत आहे.

    चंडीगडमध्ये आयुष मंत्रालयाच्या आरोग्य सुविधा आणि आयुष औषधांचे वाटप होते आहे. छत्तीसगडमध्ये जंगीर चंपामध्ये आठवडे बाजारात आयुष काढा देण्यात येतो आहे.

    या उपाययोजनांचाही केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पाठविलेल्या पत्रात ठळक उल्लेख आहे. या उपाययोजना अमलात आणायला सोप्या आणि सध्या उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून सर्व राज्ये स्थानिक पातळीवर राबवू शकतात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    TN’s taxi ambulance, Rajasthan’s mobile OPD, oxygen nurses of Kerala, among India’s best COVID practices

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!