• Download App
    Durgapur Gangrape तृणमूल काँग्रेसचा पीडितेवर निर्लज्ज आरोप! ‘दुर्गापूर गँगरेप नव्हे, पीडितेची बनावट कहाणी’

    Durgapur Gangrape : तृणमूल काँग्रेसचा पीडितेवर निर्लज्ज आरोप! ‘दुर्गापूर गँगरेप नव्हे, पीडितेची बनावट कहाणी’

    Durgapur Gangrape

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : Durgapur Gangrape पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात तृणमूल काँग्रेसने निर्लज्ज आणि धक्कादायक दावा केला आहे.Durgapur Gangrape

    टीएमसीने पीडितेवरच आरोप करत म्हटले आहे की, “ही गँगरेपची कहाणी बनावट आहे, ती आपल्या मित्राला वाचवण्यासाठीच तयार करण्यात आली आहे.”दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणात मोठा ट्विस्ट देत सांगितले की, हा गँगरेप नसून फक्त एकाच आरोपीने केलेला बलात्कार असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

    ही घटना १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी घडल्याचे सांगण्यात आले होते.पीडिता आणि तिचा मित्र वासिफ अली (२३, मालदा) हे दोघे सिटी मेडिकल कॉलेजच्या परिसरातून बाहेर पडले असताना काही अज्ञातांनी तिला ओढून जंगलात नेऊन सामूहिक बलात्कार केला, असा गंभीर आरोप झाला होता.



    या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती —आपू बौरी, शेख फिरदौस, शेख रियाजुद्दीन, शेख नासिरुद्दीन आणि शेख शफिकूल. हे सर्व तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले.

    पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून संपूर्ण कथनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    पीडिता आणि वासिफ अली हे संध्याकाळी ७:५४ वाजता कॉलेजमधून बाहेर पडताना, तर वासिफ ८:४२ वाजता एकटाच परतताना, पुन्हा ८:४८ वाजता बाहेर जाताना, आणि शेवटी ९:२९ वाजता पीडितेसोबत परतताना दिसतो.

    फुटेजमध्ये पीडिता शांतपणे चालताना, कपडे व्यवस्थित अवस्थेत दिसते. पोलिस म्हणतात, “जर जंगलात गँगरेप झाला असता, तर शारीरिक पुरावे नक्कीच सापडले असते. परंतु तसे काही आढळले नाही.”

    असन्सोल–दुर्गापूर पोलिस आयुक्त सुनिल कुमार चौधरी यांनी सांगितले, “आमच्या तपासानुसार फक्त एकाच व्यक्तीने बलात्कार केला आहे. उर्वरित आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. पीडितेचा मित्र वासिफ अली हेदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत.” सर्व आरोपींचे कपडे व नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले असून डीएनए अहवालाची प्रतीक्षा आहे.

    राज्याचे तृणमूल सरचिटणीस निलंजन दास यांनी धक्कादायक विधान करत म्हटले, “ही गँगरेपची गोष्ट खोटी आहे. पीडिता आपल्या मित्राला वाचवण्यासाठी हे बनावट प्रकरण तयार केले आहे.”

    काही स्थानिक माध्यमांनी तर असा दावा केला आहे की, पीडिता आणि तिचा मित्र जंगलात एकांतात गेले असताना काही दारुड्यांनी त्यांना पाहिले आणि लुटमार केली, त्यानंतर हे सर्व झाकण्यासाठी ‘गँगरेप’चा आरोप लावला गेला.

    पीडितेच्या वडिलांनी या सर्व आरोपांवर कठोर प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलीला बाहेर जायचे नव्हते, पण वासिफने तिला जबरदस्तीने नेले. ही योजना आधीपासून आखलेली होती,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी वासिफलाही संशयित म्हणून नमूद केले आहे.

    या प्रकरणामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी यांनी पीडितेच्या वडिलांशी बोलून आश्वासन दिले की, “दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.”

    TMC’s Shameless Accusation Against the Victim! ‘Durgapur Gangrape Never Happened, It Was a Fabricated Story,’ Claims Trinamool Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- वृद्धांना तरुणांना जंगलराजची कहाणी सांगायला लावा; नोकरीच्या बदल्यात जमीन घेणाऱ्यांपासून बिहारला वाचवायचे आहे

    मोदी ट्रम्पला घाबरतात, राहुल गांधींचे 5 दावे; मोदींची कृतीतून उत्तरे!!

    Pakistan : पाकिस्तानचा काबुलवर बॉम्बहल्ला, अफगाणिस्तानचा ड्रोन हल्ला; दोन्ही देशांत 48 तास युद्धविराम, तालिबानचा दावा- पाकने विनंती केली