• Download App
    Saugata Roy कायदा खुंटीवर टांगून ममतांच्या TMC खासदाराने संसद परिसरात ओढली इ सिगरेट; वर त्याचे केले समर्थन!!

    कायदा खुंटीवर टांगून ममतांच्या TMC खासदाराने संसद परिसरात ओढली इ सिगरेट; वर त्याचे केले समर्थन!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संपूर्ण देशात इ सिगरेट वर बंदी असताना कायदा खुंटीवर टांगून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या वयोवृद्ध खासदाराने संसद परिसरात इ सिगरेट ओढली. वर आपल्या कृतीचे समर्थनही केले.

    तृणमूल काँग्रेसचे खासदार लोकसभेत उघडपणे सिगरेट ओढतात, असा आरोप भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत केला. या मुद्द्याकडे त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे लक्ष वेधले. ओम बिर्ला यांनी सर्व संसद सदस्यांना नियम समजावून सांगत इ सिगारेट ओढणे बंद करण्याचा इशारा दिला.

    परंतु, ओम बिर्ला यांच्या इशाऱ्याचा खासदारांवर कुठला परिणाम झाल्याचे दिसले नाही. उलट तृणमूल काँग्रेसचे वयोवृद्ध खासदार सुगता रॉय यांनी संसद परिसरात संसदेच्या मकरद्वारासमोर इ सिगारेट ओढली. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केला, पण सुगता रॉय यांनी इ सिगरेट ओढण्याचे समर्थन केले. संसदेच्या इमारतीत तुम्ही इ सिगारेट ओढू शकत नाही, पण संसदेच्या बाहेर तुम्ही इ सिगारेट ओढू शकता, असा दावा सुगता रॉय यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

    त्यावर पत्रकारांनी इ सिगारेटवर 2019 पासूनच देशात बंदी आहे हे लक्षात आणून देताच अशी कुठलीही बंदी नाही. तुम्ही काय लोकसभेचे सभापती झालात का??, का केंद्रीय मंत्र्यांना खुश करण्यासाठी तुम्ही वाटेल त्या बातम्या कराल, तर तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही, अशी शेरेबाजी सुद्धा सुगंधा रॉय यांनी केली.

    ममतांची तृणमूल काँग्रेस आता आदर्श प्रस्थापित करणारी पार्टी राहिली नाही. ते स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू लागलेत, अशी टिप्पणी गिरीराज सिंह यांनी केली.

     

    TMC’s Saugata Roy over E-cigarette controversy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Assam Violence : आसाममध्ये जमावाने घरे-चौकी पेटवली, महामार्ग जाम; मध्यरात्री मॉब लिंचिंगमध्ये एकाचा मृत्यू झाला होता

    Stray Dog Attacks : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास डॉग फीडर्स जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – आमच्या टिप्पण्यांना विनोद समजू नका

    New Income Tax Act 2025 : नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार:असेसमेंट वर्षाऐवजी ‘टॅक्स इयर’ येईल, ITR फाइलिंग सोपे; करदात्यांवर काय परिणाम जाणून घ्या