• Download App
    West Bengal assembly elections; बंगालमध्ये पुढचे ४ टप्पे वगळा, एकाच टप्प्यात मतदान घ्या; तृणमूळ काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी|TMC's position is clear, we want remaining elections to be held in one phase, I request BJP to make their position clear, says TMC leader Derek O'Brien

    West Bengal assembly elections : बंगालमध्ये पुढचे ४ टप्पे वगळा, एकाच टप्प्यात मतदान घ्या; तृणमूळ काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

    वृत्तसंस्था

    कोलकाता : सध्याच्या स्थितीत कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यास पहिले प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे बंगालच्या विधानसभा निवडणूकीतील ४ टप्प्यांमधील मतदान वगळून सर्व मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान घेण्यात यावे, अशी मागणी तृणमूळ काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.TMC’s position is clear, we want remaining elections to be held in one phase, I request BJP to make their position clear, says TMC leader Derek O’Brien

    निवडणूक आयोगाने आज कोलकात्याच्या सर्किट हाऊसमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्याला तृणमूळ काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह त्यांचे सहकारी, तसेच भाजपच्या वतीने सरचिटणीस भूपेंद्र यादव, स्वप्न दासगुप्ता आदी उपस्थित होते.



    प्रत्येक पक्षाने निवडणूक आयोगासमोर आपापली भूमिका मांडली. त्यात तृणमूळ काँग्रेसने मतदानाचे उर्वरित ४ टप्पे रद्द करून एकाच टप्प्यात सर्व मतदारसंघांमध्ये मतदान घेण्याची मागणी केली. तिला बाकीच्या पक्षांनी पाठिंबा दिलेला नाही.

    मतदानाच्या टप्प्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडे

    भाजपने मतदानाच्या टप्प्यांचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपविला. कोरोना प्रोटोकॉल पाळून प्रचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच बंगालमध्ये लोकशाहीला सुसंगत असे निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावेत, असे सूचित केले.

    निवडणूकीत झालेल्या हिंसाचाराकडेही निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कोणते नियम पाळावेत, हे निवडणूक आयोगाने जाहीर करावे, ते भाजपचे नेते पाळतील, असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले.

    काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि फुर्फुरा शरीफ आपली भूमिका नंतर निवडणूक आयोगाला कळवतील, असे सांगण्यात आले.

    TMC’s position is clear, we want remaining elections to be held in one phase, I request BJP to make their position clear, says TMC leader Derek O’Brien

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही