विशेष प्रतिनिधी
कोलकता : अलीपूरद्वारचे खासदार जॉन बार्ला यांना केंद्रीय मंत्रिपद देण्याने भाजपचा बंगालच्या विभाजनास पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाने केला आहे.TMC targets BJP over minister issue
तृणमूलचे नेते सौगत रॉय म्हणाले की, बार्ला यांनी बंगालच्या विभाजनाची वक्तव्ये केली आहेत. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या भाजपने त्यांच्या विधानांना पाठिंबा आहे का, हे स्पष्ट करावे. बार्ला हे विभाजनवादी प्रवृत्तीचे आहेत.
गेल्या दोन वर्षांत संसदेत धड बोलताना सुद्धा मी पाहिले नाही. त्यावरून ते कोणत्या प्रकारचे मंत्री ठरतील याचा अंदाज कुणीही बांधू शकेल.भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूलची टीका फेटाळून लावली. ते म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत.
बंगालच्या कोणत्याही विभाजनास पक्षाचा पाठिंबा नाही. बार्ला हे चांगले मंत्री ठरतील आणि ते जनतेसाठी कार्य करू शकतील असे पक्षनेतृत्व आणि आमच्या पंतप्रधानांना वाटले. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेइतके यश आले नसले तरी उत्तर बंगालमध्ये केंद्रातील सत्ताधारी पक्षाने लक्षवेधी मुसंडी मारली. या कामगिरीचे शिल्पकार बार्ला होते.
उत्तर बंगाल हा केंद्रशासित प्रदेश करण्याची जाहीर मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे ते तृणमूलच्या टीकेचे केंद्रस्थान ठरले. याच बार्ला यांना अल्पसंख्याक कल्याण खात्याचे राज्य मंत्रिपद देण्यात आले.
TMC targets BJP over minister issue
विशेष प्रतिनिधी
- फेसबुकवरील कंटेटमुळे समाजाचे ध्रुवीकरण सहज शक्य – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
- कोरोना काळातही आयटी कंपन्यांची भरभराट, महसुलात दुपटीने वाढ होणार
- ‘बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर चुकीचा’, स्मृती इराणींवर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
- अबब… भारतीय घराणेशाहीही लाजेल! एकाच घरात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व सात मंत्री!! श्रीलंकेत फक्त राजपक्ष कुटुंबाचीच सत्ता