वृत्तसंस्था
कोलकता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते हे तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी कार्यालयाबाहेर रांग लावत असल्याचा दावा सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. TMC targets BJP
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले, की राज्यातील भाजप नेते आणि त्यातही आमदार असणारे हे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर रांग लावत आहेत. परंतु दरवाजा बंद आहे. जर दरवाजा उघडला तर नक्कीच भाजप कोलमडून पडेल. ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत राज्याबाहेरच्या लोकांना पिटाळून लावले होते.
आगामी निवडणुकीतही असेच घडणार आहे. त्रिपुरातील भाजप सरकारने निवडणूक प्रचारसभा रोखण्यासाठी जमावबंदीचा कायदा लागू केला आहे. यावर बोलताना बॅनर्जी म्हणाले, की त्रिपुरात किती दिवस निर्बंध लागू ठेवाल. येत्या विधानसभेला तृणमूलचा नक्कीच विजय होईल. येत्या तीन महिन्यांत तृणमूलचे यश लोकांना पाहावयास मिळेल, असा दावाही त्यांनी केला. त्रिपुरात पुढील वर्षाच्या प्रारंभी विधानसभा निवडणूक होत आहे.
TMC targets BJP
महत्त्वाच्या बातम्या
- महागडे हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला , २२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सुरू होतील चित्रपटगृहे
- HCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, फ्रेशर्स इंजिनियर विद्यार्थ्यांसाठी भरती
- WATCH :आरोग्य विभाग अन् मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे – खा. नवनीत राणा
- WATCH : चित्रपटगृह चालक आनंदी, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत