• Download App
    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आता थेट गृहमंत्री अमित शहांवरच आरोप, राजकीय संघर्ष संपेना । TMC targets Amit Shah from Attack

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आता थेट गृहमंत्री अमित शहांवरच आरोप, राजकीय संघर्ष संपेना

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा थेट आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी केला. अभिषेक बॅनर्जी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत. त्यामुळे तृणमुल कॉंग्रेस व भाजपमधील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. TMC targets Amit Shah from Attack



    भाजपशासित त्रिपुरात स्वतंत्र घटनांत अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांवर नुकतेच हल्ले करण्यात आले. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कोलकत्यातील ‘एसएसकेएम’ शासकीय रुग्णालयात तृणमूलच्या जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय असे हल्ले घडविणे शक्य नाही. त्रिपुरा पोलिसांच्या समोरच हे हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी मूक प्रेक्षकाची भूमिका घेतली. या हल्ल्यांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाच हात आहे. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये हल्ल्यांच्या चौकशीचा आदेश देण्याचे धैर्य नाही.

    TMC targets Amit Shah from Attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे