कोलकाता पीडितेच्या बाजूने उभे राहणे काँग्रेसला महागात पडले?
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसने रविवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीनंतर टीएमसीने हे प्रत्युत्तर दिले आहे. TMC demanded resignation of Chief Minister Siddaramaiah
खरे तर इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी सरकारने उचललेल्या पावलांचे समर्थन केले आहे. मात्र, राहुल गांधी यांनी म्हटले की, “कोलकाता पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
सरकारला घेराव घालत असल्याचे पाहून टीएमसीने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. MUDA जमीन घोटाळ्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नाव आल्यावर टीएमसीचे माजी राज्यसभा खासदार कुणाल घोष म्हणाले, “राहुल गांधी, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगाल का? हा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप आहे ममता बॅनर्जींनी जे पाऊल उचलले, त्यावर तुम्ही सोशल मीडियावर टिप्पणी केली, आता तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई कराल का?
TMC demanded resignation of Chief Minister Siddaramaiah
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार