• Download App
    संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसच्या जोर बैठका; अधिरंजन चौधरी यांना पक्षाच्या लोकसभा नेते पदावरून हटविण्याच्या हालचाली TMC, Congress warm up? Sonia set to replace Adhir as Lok Sabha leader

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसच्या जोर बैठका; अधिरंजन चौधरी यांना पक्षाच्या लोकसभा नेते पदावरून हटविण्याच्या हालचाली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसने जोर बैठका काढण्यास सुरुवात केली असून लोकसभेत पक्ष नेतेपदावरून अधिरंजन चौधरी यांची हकालपट्टी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. TMC, Congress warm up? Sonia set to replace Adhir as Lok Sabha leader

    पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्या नंतर काँग्रेसने पक्षातील वाढत्या दबावामुळे संघटनात्मक फेरबदल करण्यास सुरुवात केली. आता संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसने अधिरंजन चौधरी यांची लोकसभेच्या पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचे सोनिया गांधी यांनी ठरविले आहे.
    पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या पराभवानंतर चौधरी यांनी सांगितले की, पक्षाने सोशल मीडियाच्या कोषातून बाहेर पडावे आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी कार्य करावे. हे वक्तव्य त्यांनी सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून केले होते. आता तर सोनिया गांधी यांनी अधिवेशनापूर्वी पक्ष संघटना आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे ठरविले आहे. त्यात चौधरी यांची नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचे हे पहिले पाऊल उचलण्यात येत असल्याचे मानले जात आहे.

    चौधरी हे पश्चिम बंगालच्या बहारामपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते पक्षाचे चेहरा होते. काँग्रेस पक्षात G -23 या नेत्यांचा एक दबाव गट सक्रिय झाला आहे. या गटावर आक्रमक टीका करण्यात चौधरी आघाडीवर होते.

    G -23 गटातील नेत्यांनी पक्षात प्रभावी गट तयार करून पक्ष श्रेष्ठी आणि त्याच्या कार्यपद्धतीवर वारंवार टीकाही केली आहे. या गटात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असून त्यांनी पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्याचा घोषा लावला आहे. तसेच पत्रही ऑगस्टमध्ये लिहिले होते.

    पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला चुचकारण्यासाठी अधिरंजन चौधरी यांचा पत्ता कापण्याचे प्रयोग काँग्रेसने सुरु केल्याची चर्चा सुरु आहे. त्याद्वारे तृणमूल आणि काँग्रेसची मोट बांधून मोदी सरकारला लोकसभेत घेरण्याची चाल रचली आहे. या पूर्वी काँग्रेसने डाव्या पक्षांशी आघाडी करून तृणमूला काँग्रेसला पश्चिम बंगालमधून सत्तेतून बाहेर खेचण्याचा डाव रचला. दुसरीकडे ममता बनर्जीवर थेट टीका करण्याचे काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांनी टाळले. विशेष म्हणजे विजयानंतर बॅनर्जी यांच्या विजयाचे स्वागत केले. परंतु चौधरी हे सातत्याने बॅनर्जी आणि सरकारवर टीका करत राहिले.



    पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी निवडणूक पश्चात झालेल्या हिंसाचाराचा प्रश्न उचलून धरून राज्य सरकारपुढे मोठे धर्मसंकट उभे केले आहे. तृणमूलच्या मुस्लिम गुंडांना धडा शिकविण्याचा चंग बांधला आहे. ही बाब तृणममूलला खटकत आहे. त्यामुळे राज्यपाल यांना माघारी बोलविण्यासाठी लोकसभेच्या अधिवेशनात फिल्डिंग लावण्याचे तृणमूल काँग्रेसने ठरविले असून त्यासाठी काँग्रेसची आणि डाव्या पक्षांची साथ हवी आहे. त्यामुळे आणि G23 नेत्यांनी पक्ष संघटना बदल करण्याची केलेली मागणी पाहता अधिरंजन चौधरी यांचा राजकीय बळी देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. असे करताना पश्चिम बंगालमधील पराभवाचे खापर अधिरंजन चौधरीवर फोडून राहुल गांधींना नेहमीप्रमाणे क्लीनचिट देण्याचा हा एकप्रकारे खटाटोप आहे. दुसरीकडे आपल्या मर्जीतील नेता निवडून G- 23 गटाला शांत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    शशी थरूर अथवा राहुल गांधी नेते ?

    थिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर किंवा आनंदपूरसाहेबचे खादार मनीष तिवारी हे लोकसभा पक्ष नेतेपदाच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे G- २३ गटातील नेत्यांपैकी आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत बदल करण्यासाठी लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षऱ्या केला आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर वायनाडचे खासदार राहुल गांधी हे लोकसभेत ५२ खासदारांचे नेतृत्व करणार का ? याचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, मनीष तिवारी यांना पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करावे, अशी विनंती मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांनी केली. त्यामुळे शशी थरूर आणि राहुल गांधी यांच्यापैकी एक काँग्रेस लोकसभेच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.

    TMC, Congress warm up? Sonia set to replace Adhir as Lok Sabha leader

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य