• Download App
    तामिळनाडूच्या मंत्र्याची बुद्धी भ्रष्ट झाली, जीभ घसरली; मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली!! TM Ambarasan minister of tamilnadu vidoe viral

    तामिळनाडूच्या मंत्र्याची बुद्धी भ्रष्ट झाली, जीभ घसरली; मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली!!

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूतल्या सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळकम पक्षाच्या नेत्यांचे तारतम्य आधीच सुटले आहे ते सनातन धर्माला शिव्या देतच आहेत, पण त्या पलीकडे जाऊन त्या पक्षाचे मंत्री तर बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे मोदींना जीवे मारण्याची धमकी देऊन बसले. TM Ambarasan minister of tamilnadu vidoe viral

    तामिळनाडूचे मंत्री टी. एम. अंबरसन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मी मंत्री असल्यामुळे मी सध्या शांतता राखली आहे. मी मंत्री नसतो, तर मी त्यांचे (पीएम मोदी) तुकडे केले असते, अंबरसन म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसते

    त्यांचे हे वक्तव्य गेल्या आठवड्यातले आहे. सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये अंबरसन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. टी. एम. अंबरसन हे तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील DMK-काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ग्रामीण उद्योग मंत्री आहेत.

    आमचे अनेक पंतप्रधान झाले आहेत, कोणीही असे बोलत नव्हते. मोदी आम्हाला संपवण्याची गोष्ट करतात, पण मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो की द्रमुक ही सामान्य संघटना नाही. अनेक बलिदान आणि रक्तपातानंतर ती बांधली गेली आहे. जे द्रमुकला उद्ध्वस्त करण्याचे बोलले ते उद्ध्वस्त झाले. ही संघटना कायम राहील हे लक्षात ठेवा. मी त्यांच्याशी (पीएम मोदी) वेगळ्या पद्धतीने वागलो असतो. सध्या मी मंत्री आहे, म्हणून गप्प आहे. मी मंत्री झालो नसतो, तर त्यांचा मी काटा काढला असता.

    – I.N.D.I.A. आघाडीचा अजेंडा स्पष्ट

    भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, I.N.D.I.A. युतीचा अजेंडा यापेक्षा अधिक स्पष्ट असू शकत नाही. सनातन धर्म आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा नाश करणे हाच त्यांचा हेतू आहे. त्याचवेळी, भाजपचे राष्ट्रीय सचिव सत्य कुमार यादव म्हणाले की, पुन्हा एकदा “इंडिया” आघाडीने खालची पातळी गाठली. त्या आघाडीच्या नेत्यांना लोकसभेचे निकाल माहिती आहेत म्हणूनच ते पंतप्रधान मोदींना शिव्या देत आहेत.

    TM Ambarasan minister of tamilnadu vidoe viral

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र