Wednesday, 7 May 2025
  • Download App
    मिलिंद देवरांना राहुलशी बोलायचे होते, पण जयराम रमेश म्हणाले, तो "फार्स", मोदींनीच साधले "टायमिंग"; एक मिलिंद देवरा गेले, तर लाख मिलिंद देवरा येतील!!'Timing determined by PM': Jairam Ramesh reveals last conversation with Milind Deora

    मिलिंद देवरांना राहुलशी बोलायचे होते, पण जयराम रमेश म्हणाले, तो “फार्स”, मोदींनीच साधले “टायमिंग”; एक मिलिंद देवरा गेले, तर लाख मिलिंद देवरा येतील!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सहज काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने त्यांच्या जागेवर दावा ठोकल्यानंतर त्यांना थेट राहुल गांधींना भेटून त्यांच्याशी बोलायचे होते. पण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले, तो त्यांचा “फार्स” होता. पंतप्रधानांनी “टायमिंग” साधूनच मिलिंद देवरांची काँग्रेस मधून “एक्झिट” निश्चित केली होती, पण एक मिलिंद देवरा गेले, तर लाख मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये येतील!! जयराम रमेश यांच्या या वक्तव्याची बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे’Timing determined by PM’: Jairam Ramesh reveals last conversation with Milind Deora

    पण यातून काँग्रेसची वर्षानुवर्षे निष्ठावंत राहिलेल्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांची काँग्रेसचे नेते किती उद्दामपणे वागू शकतात, याचेच हे ताजे उदाहरण ठरले आहे.



    वास्तविक मिलिंद देवरांना दक्षिण मुंबई या आपल्या लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसने “त्याग” करून तो शिवसेनेच्या ठाकरे गटाला “बहाल” करावा हे मान्य नव्हते. कारण ते तिथून दोन वेळा खासदार झालेच होते, पण त्यानंतर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव केला होता. पण 2024 च्या निवडणुकीत या जागेवर आपलाच दावा काँग्रेसने शिवसेनेकडून मान्य करून घ्यायला हवा होता, असा मिलिंद देवरांचा आग्रह होता आणि तो त्यांना थेट राहुल गांधींची बोलून मान्य करून घ्यायचा होता. या भावना त्यांनी जयराम रमेश यांच्याशी शुक्रवारीच बोलून देखील दाखवल्या होत्या त्यांना राहुल गांधींशी बोलायचे होते पण ते शक्य झाले नाही आणि मिलिंद देवरांना आपला स्वतंत्र निर्णय आज जाहीर करणे भाग पडले.

    काँग्रेसमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा सोनिया गांधी यांच्याशी थेट कोणालाही बोलता येत नाही, हे मिलिंद देवरांचे केवळ पहिलेच उदाहरण नाही, याआधी अशी अनेक उदाहरणे घडली. काँग्रेसने अनेक भावी मुख्यमंत्री यातून गमावले, पण काँग्रेस नेत्यांचा उद्दामपणा बिलकुलच कमी झाला नाही.

    आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते ते राहुल गांधींची भेट वारंवार मागत होते. अखेरीस बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यानंतर त्यांना राहुल गांधींची भेट मिळाली. त्यांनी आसाम मधल्या काँग्रेसची परिस्थिती राहुल गांधींना सांगायला सुरुवात केली. त्यावेळी राहुल गांधींनी त्यांचे ऐकण्याचे सोडून ते आपल्या कुत्र्याला बिस्किटे खायला घालू लागले, हे पाहिल्यावर हेमंत विश्वशर्मा संतापले आणि त्यांनी काँग्रेस बाहेरचा रस्ता पकडून भाजपचा रस्ता धरला काँग्रेस. त्यानंतर काँग्रेस एकदा नव्हे दोनदा आसाम मध्ये हरली आणि काँग्रेसने तयार केलेला नेता हेमंत विश्वशर्मांच्या रूपाने भाजपने मुख्यमंत्री करून दाखविला.

    त्यावेळी देखील असा एकच हेमंत विश्वशर्मा सोडून गेले होते, पण तेच काँग्रेसला आसाम मध्ये “भारी” ठरले. आजही एकच मिलिंद देवरा सोडून गेला आहे, तर लाख मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये येतील, असे जयराम रमेश म्हणाले आहेत, काँग्रेसचे दक्षिण मुंबई तर सोडाच, पण मुंबई, महाराष्ट्र आणि देशातले राजकीय भवितव्य काय असेल??, अधोरेखित करणारे हे उद्दाम वक्तव्य आहे!!

    ‘Timing determined by PM’: Jairam Ramesh reveals last conversation with Milind Deora

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Indian Army भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील कोणती 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली?

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- भारतात आरक्षण रेल्वेच्या डब्यासारखे; आत असलेल्यांना वाटते इतरांनी आत येऊ नये

    PM Modi : पाकिस्तानवर एअर स्ट्राइकपूर्वी PM म्हणाले होते- भारताचे पाणी भारतासाठी वाहणार