• Download App
    काँग्रेसमध्ये 40 % महिलांना तिकीट; शेकडो महिलांनी काँग्रेस सोडली, अनेकींचे अपमान केले त्याचे काय?; रिटा बहुगुणा जोशी यांचे वाग्बाण Tickets to 40% women in Congress

    काँग्रेसमध्ये 40 % महिलांना तिकीट; शेकडो महिलांनी काँग्रेस सोडली, अनेकींचे अपमान केले त्याचे काय?; रिटा बहुगुणा जोशी यांचे वाग्बाण

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 % महिलांना तिकीट देणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली त्यावरून राजकीय वर्तुळात क्रिया प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.Tickets to 40% women in Congress

    शेकडो महिला काँग्रेस सोडून गेल्या. सुष्मिता देव, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारख्या महिलांना काँग्रेस बाहेर पडण्यापासून रोखू शकली नाही. माझ्या सारख्या जुन्या महिला नेत्याचा काँग्रेसमध्ये अपमान झाला, अशी तीव्र प्रतिक्रिया उत्तर प्रदेश भाजपच्या नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये महिलांचे राजकीय शोषण होते. त्यांना तिथे सुरक्षित वाटत नाही म्हणून तर त्या काँग्रेस सोडून जातात ना!!, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    प्रियंका गांधी यांनी एक नवी राजकीय खेळी म्हणून 40% टक्के महिलांना काँग्रेस उमेदवारी देणार असल्याची घोषणा केली. काँग्रेससाठी ही नवसंजीवनी देणारी घोषणा ठरू शकेल असा त्यांचा राजकीय होरा आहे. परंतु उत्तर प्रदेशात काँग्रेसची राजकीय प्रकृती आता अक्षरश: तोळामासा झाली आहे. 403 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे फक्त 8 आमदार आहेत. पक्षापुढे स्वतंत्रपणे विधानसभेचे निवडणूक लढविण्याचे फार मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी 40% टक्के महिला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. परंतु काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या रिटा बहुगुणा जोशी यांनी या मुद्द्यावर काँग्रेसच्या हायकमांड वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    काँग्रेस आता महिलांना तिकीट देण्याची घोषणा करते आहे. परंतु आत्तापर्यंत कितीतरी निवडणुका झाल्या त्यावेळी काँग्रेसला महिला आठवल्या नाहीत का? त्या पक्षाने किती महिलांना सन्मानाने निवडणुकीची तिकिटे दिली?, असा सवाल रिता बहुगुणा जोशी यांनी केला.

    Tickets to 40% women in Congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Land-for-Job Case: लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबासह 40 जणांवर आरोप निश्चित; लालू-राबडी, तेजस्वी-मीसा, हेमा-तेजप्रताप यांच्यावर खटला चालणार

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही