वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रियांका गांधी यांनी सोमवारी हैदराबादच्या सरूरनगर स्टेडियममध्ये युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जनतेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, राज्यात सरकार आल्यावर तेलंगणातील तरुणांना सरकारी अनुदानित खासगी कंपन्यांमध्ये 75% आरक्षण मिळेल. बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल.Throw out the KCR government, Priyanka Gandhi is tough in Telangana, promises youth 75% reservation in companies, unemployment allowance of Rs 4000
राज्यातील 2 लाख रिक्त पदे एका वर्षात भरण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाणार आहे. शहीद जवानांच्या पालकांना किंवा त्यांच्या पत्नींना 25 हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाईल. शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षांवरील मुलींना इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक झोनमध्ये कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
या जमिनीसाठी शेकडो लोकांनी बलिदान दिले
प्रियांका गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या की, तुम्ही तेलंगणाला माता म्हणता. हे राज्य तुमच्यासाठी फक्त जमिनीचा तुकडा नाही किंवा नकाशावर रेखाटलेली रेघ नाही. ही पृथ्वी आहे जिला तुम्ही माता मानता. या पृथ्वीसाठी शेकडो लोकांनी बलिदान दिले. माझ्या कुटुंबानेही अनेक बलिदान दिले आहेत, इंदिरा अम्मा देशासाठी शहीद झाल्या.
त्यागाचा अर्थ आम्हांला माहीत आहे, माझी आई सोनियांना तुमचा मुद्दा कळला, निर्णय अवघड होता, तरीही आम्ही राजकारणाचा विचार केला नाही.
केसीआर सरकारला वाटतं- तेलंगण त्यांची जहागीर आहे!
देशासाठी आणि तेलंगणासाठी शहीद झालेल्या लोकांचे स्वप्न होते की राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. हुतात्म्यांचा नारा होता पाणी, निधी आणि रोजगार, पण आज राज्यात सत्ताधारी पक्षालाच पाणी मिळत आहे. त्यांना निधी मिळत आहे, सरकारच्या जवळच्या लोकांना नोकऱ्या मिळत आहेत.
केसीआर सरकार तेलंगणातील लोकांची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीये. त्यांना वाटतं की, हा प्रदेश त्यांची जहागिरी आहे आणि ते त्याचे नवे मालक आहेत. त्यांना इथून उखडून टाका, असे आवाहनही प्रियांका गांधी यांनी केले.
Throw out the KCR government, Priyanka Gandhi is tough in Telangana, promises youth 75% reservation in companies, unemployment allowance of Rs 4000
महत्वाच्या बातम्या
- 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, याचिकाकर्त्याने म्हटले- राहुल यांना शिक्षा सुनावणाऱ्या जजचाही समावेश
- ‘द केरला स्टोरी’ तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार नाही, मल्टिप्लेक्स संघटनेचा निर्णय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दिला हवाला
- केरळमध्ये हाऊसबोट बुडाल्याने 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख, मृतांच्या वारसांना मदत जाहीर
- 2024 प्रजासत्ताक दिन संचलनात फक्त महिला सैनिक, अधिकारी, बँड आणि चित्ररथ हवेत; संरक्षण मंत्रालयाची ऐतिहासिक सूचना