वृत्तसंस्था
कोलकता : नारद गैरव्यवहारप्रकरणी कोलकता सत्र न्यायालयाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यासह तीन नेत्यांना जामीन मंजूर केला. परिवहन मंत्री फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोवन चॅटर्जी यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या हमीपत्रावर जामीन देण्यात आला. याप्रकरणी २८ जानेवारी रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहावे असा आदेशही देण्यात आला. Three TMC leaders gets bail in Narada scam
या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करीत आहे. या तिघांसह सुब्रत मुखर्जी यांची चौकशी करण्यास राज्यपाल जगदीप धनकर यांनी दहा मे रोजी मंजुरी दिली होती.
नारद न्यूज संकेतस्थळाचे पत्रकार मॅथ्यु सॅम्युएल यांनी २०१४ मध्ये स्टींग ऑपरेशन केले होते. त्यात तृणमूलच्या मंत्री आणि आमदारांसारखे दिसणारे चार नेते काही लोक बनावट कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले. चौघांना अटक करण्यात आली होती. तेव्हा काही जण ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यामुळे खळबळ माजली होती. २०१६च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या स्टींग ऑपरेशनचा गौप्यस्फोट करण्यात आला होता.
Three TMC leaders gets bail in Narada scam
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी