• Download App
    दररोज तीन हजार अफगाणी लोक इराणला कामासाठी जातात: बेरोजगारीचा परिणाम। Three thousand Afghans to Iran every day Go to work: the consequences of unemployment

    दररोज तीन हजार अफगाणी लोक इराणला कामासाठी जातात: बेरोजगारीचा परिणाम

    वृत्तसंस्था

    काबुल: बेरोजगारीमुळे दररोज ३ हजारहून अधिक अफगाण लोक इराणमध्ये जातात, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी अफगाणिस्तानच्या हेरात आणि निमरोझ प्रांतातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. विशेष म्हणजे, या प्रांतांतून कायदेशीररीत्या इराणला जाणार्‍या लोकांची संख्या ही आहे आणि त्यात बेकायदेशीरपणे सीमा ओलांडणार्‍यांचा समावेश असेल तर त्यापेक्षा जास्त असू शकते, टोलो न्यूजने वृत्त दिले आहे. Three thousand Afghans to Iran every day Go to work: the consequences of unemployment



    इराणमध्ये जाणारे अफगाण लोक देश सोडण्यामागे गंभीर आर्थिक समस्या आणि बेरोजगारीचे कारण सांगतात. हेरात येथील रहिवासी फरहाद सुल्तानी म्हणाला,”माझ्याकडे नोकरी नाही आणि आम्ही बेरोजगार आहोत, आम्ही इराणला जात आहोत.” फर्याबमधील रहिवासी सुलतान मीर यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये कोणतेही काम नाही आणि ते काम शोधण्यासाठी तेहरानला जात आहेत.

    Three thousand Afghans to Iran every day Go to work: the consequences of unemployment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार