• Download App
    जम्मू आणि काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खातमा, शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलांची कारवाई|Three terrorist kill in J and K

    जम्मू आणि काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खातमा, शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलांची कारवाई

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत बुधवारी तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर, दलाने शोपियाँ जिल्ह्यातील चक-ए-चोलन गावात शोधमोहिम राबविली.Three terrorist kill in J and K

    यावेळी, दहशतवाद्यांनी दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल दलाने केलेल्या गोळीबारात सुरुवातील एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर, दलाने आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.



    सुरक्षा दले व दहशतवाद्यां दरम्यान उशीरापर्यंत चकमक सुरू होती.गेले काही दिवस शांत भासणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांनी त्याविरुद्ध मोठी व्यापक मोहीम सुरु केली आहे.

    Three terrorist kill in J and K

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता