विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्करे- तैयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. इलियास अहमद दार उर्फ समीर, उबैद शफी उर्फ अब्दुल्ला आणि अकिब अहमद लोन उर्फ साहिल अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.Three terrorist died in Jammu and Kashmir
हे तिघेही लष्करे-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. सुरक्षा दलांच्या कार्यालयांवरील हल्ल्यात त्यांचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुरक्षा दलाला दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर, जिल्ह्यातील कोमेरनाग परिसरातील वैलूमध्ये शोधमोहिम राबविण्यात आली.
या शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी निदर्शनास आले.
दलाने त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, दहशतवाद्यांनी दलावर बेछूट गोळीबार केला. दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. या कारवाईदरम्यान काही नागरिकही अडकून पडले होते.
त्यामुळे, गोळीबाराच्या ठिकाणांहून त्यांची सुखरुप सुटका करेपर्यंत दलाने काही काळ कारवाईही थांबविली होती. सर्व नागरिक सुखरूप असल्याचे लक्षात आल्यानंतर दलाने दहशतवाद्यांविरुद्ध पुन्हा कारवाईला सुरूवात केली. त्यानंतर, दहतशवाद्यांचा खातमा करण्यात आला.
Three terrorist died in Jammu and Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या भारतीय अवताराचा जगालाही मोठा धोका, आरोग्य संघटनेचा पुन्हा इशारा
- ‘बेन्नू’ या लघुग्रहावरून माती आणि खड्याचे नमुने गोळा करून नासाचे ओसिरीस-रेक्स’ निघाले पृथ्वीकडे
- Goa Lockdown : गोव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊल ; पर्यटकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यकच
- अन् केंद्र सरकार पुण्याच्या मदतीला धावून आले… मोक्याच्या क्षणी ८८ टन ऑक्सिजन केला उपलब्ध.. नाहीतर ओढविले असते भीषण संकट