विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या रिक्त जागांवर देवानंद शिंदे, राजीव जाधव व प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव व निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यपालांनी त्यास मंजुरी दिली.Three members deputed on MPSC board
वयाची ६२ वर्षे किंवा नियक्तीपासून सहा वर्षे असा या सदस्यांचा कार्यकाल असेल. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळालेल्या स्वप्नील लोणकर या युवकाच्या आत्महत्येमुळे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी लोकसेवा आयोगाच्या कारभारावर टीका केली होती.
त्यावेळी आयोगाकडून होणारी भरती प्रक्रिया गतिमान करण्यासह आयोगाच्या सदस्यपदाच्या रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार तीन सदस्यांची नावे निश्चित करून ती फाइल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती.
Three members deputed on MPSC board
महत्त्वाच्या बातम्या
- सरकार चर्चेला तयार पण विरोधकच चर्चेसाठी तयार नाहीत, रविशंकर प्रसाद यांचा आरोप
- गौडबंगाल : आमदार निलेश लंके यांनी मारहाण केल्याची तक्रार लिपीकाने केली आणि परतही घेतली!
- पंतप्रधानांनी सांगितला पाच ऑगस्टचा महिमा…हॉकी मेडल मिळाले, राम मंदिराच्या निर्माणाला सुरूवात झाली आणि काश्मीरमधून कलम ३७० हटले
- मी आनंदी आहे, पण पूर्ण समाधानी नाही; सुवर्णपदकासाठी यापुढे अधिक मेहनत करेन; रवी दहियाने व्यक्त केल्या भावना