विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI आघाडीचे अशोका हॉटेलमध्ये झालेली बैठक होऊन आता आठवडा उलट झाला शेवटी आम्हाला तोंडे बंद ठेवून जागा वाटपाची चर्चा करावी लागेल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांना आपल्याच आघाडीतल्या नेत्यांना द्यावा लागला पण दरम्यानच्या काळात मध्यप्रदेश सारख्या मोठ्या राज्यात भाजपने बिनबोभाट बड्या भाकऱ्या फिरवून घेतल्या!!Three heavyweights are in Madhya Pradesh cabinet
INDI आघाडीतल्या दिल्लीतल्या बैठकीत 31 डिसेंबर पर्यंत सर्व राज्यांमध्ये जागावाटप पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले प्रत्यक्षात 25 डिसेंबर उलटून गेला तरी अधिकृत चर्चा सुरू झालेली नाही पण आघाडीतलेच नेते अनेक तोंडाने अनेक भाता बोलू लागल्याने काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी तोंडे बंद ठेवून आघाडीचे जागावाटप करावी लागेल असा इशारा दिला
पण याच कालावधीत मध्यप्रदेश सारख्या मोठ्या राज्यात भाजपने मात्र बड्या भाकऱ्या बिनबोभाटटपणे फिरवून घेतल्या. पक्षात कुठेही हू की चू झाले नाही.
मध्य प्रदेशात डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. यामध्ये 28 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात भाजपचे केंद्रीय पातळीवरचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय, प्रल्हाद सिंह पटेल या नेत्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. माजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना आधीच मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष केले आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे केंद्रीय पातळीवरचे नेते पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय आणि माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना भाजपने मध्य प्रदेशात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली आहे.
काँग्रेसची पठडीच्या भाषेत बोलायचे झाले तर,
नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजयवर्गीय आणि प्रल्हाद सिंह पटेल हे काँग्रेसच्या भाषेत भाजप मधले हेवीवेट नेते आहेत, पण या हेवीवेट नेत्यांना पक्षादेशानुसार त्यांच्या तुलनेत ज्युनिअर असलेल्या मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करावे लागणार आहे.
Three heavyweights are in Madhya Pradesh cabinet
महत्वाच्या बातम्या
- मंबाजी – तुंबाजी : पवारांचे कुटुंब, त्यांची जबाबदारी; सामनाच्या अग्रलेखातून काका – पुतण्याबरोबरच शिंदे – पटेलांचीही धुलाई!!
- 78 वर्षांनंतर जपानची शस्त्रास्त्रे निर्यातीला मंजुरी, सुरक्षा बजेटमध्ये एकाच वेळी 16% वाढ
- माजी विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बेला दिले 57 कोटी रुपये; निधीतून AI लॅब बनणार, शिष्यवृत्तीही दिली जाणार
- बारटी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत गोंधळ; 2019 ची प्रश्नपत्रिका जशास तशी 2023 ला आल्याचा आरोप