• Download App
    तालिबानला जबरदस्त दणका, मुजाहिद्दीन यांचा एल्गार ; तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त । Three districts liberated from terrorists Taliban in Afghanistan

    तालिबानला जबरदस्त दणका, मुजाहिद्दीन यांचा एल्गार ; तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त 

    वृत्तसंस्था

    काबुल : अफगाणिस्तानमधील काही गटांनी तालिबानविरोधात एल्गार पुकारला असून त्यांच्या कब्जातील भाग जिंकण्यास सुरुवात केली आहे. तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त केल्याचा दावा अफगाण न्यूजने केला आहे. Three districts liberated from terrorists Taliban in Afghanistan

    अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा करून एक आठवडा उलटला असताना आता तालिबानला कडवे आव्हान मिळण्यास सुरुवात झाली आहे. काही गटांनी त्यांचे भाग तालिबानच्या ताब्यातून हिसकावण्यास सुरुवात केली आहे. तीन जिल्हे मुक्त केल्याचा दावा अफगाण न्यूजने केला.
    अब्दुल हामिद दादगर यांनी तालिबानच्या ताब्यातील अंद्राब बघलान प्रांतातली तीन जिल्ह्यांना मुक्त केले आहे. पंजशीर भागात तालिबान विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकांनी आघाडी उघडली आहे. या सर्वांचे नेतृत्व अहमद मसूद करत आहे.  अहमद मसूद हे तालिबानला पराभवाची धूळ चारणारे अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत.



    तालिबानविरोधातील लढाईला बळ

    अहमद मसूद यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील एका लेखातून तालिबानविरोधातील लढाईला बळ देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच पंजशीर भागात त्यांच्यासोबत मुजाहिद्दीनचे हजारो योद्धे आहेत. ते तालिबानविरोधात लढण्यासाठी तयार आहेत, असे सांगितले. अमेरिका अफगाणिस्तानमधून निघून गेली तरी ते आम्हाला हत्यारे आणि इतर मदत करू शकतात. त्यामाध्यमातून आम्ही तालिबानला मात देऊ शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, अफगाणिस्तानच्या सैन्यातील अनेक आजी-माजी सैनिक पंजशीरमध्ये अहमद शाह मसूदसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.

    पंजशीर प्रांतात कडवी टक्कर मिळणार

    स्वत:ला अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित करणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांनीही तालिबानविरोधात आघाडी उघडली आहे.ते रणनीती आखत आहेत. त्यासाठी माजी सैनिक, पोलिस आणि इतरांसोबत ते चर्चा करत आहे. अमरुल्लाह सालेह सध्या पंजशीर प्रांतात आहेत. त्यामुळे तालिबानला येथून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

    Three districts liberated from terrorists Taliban in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे जेट-इंधन मार्चमध्ये 6% महागले; रुपया घसरल्यामुळेही भारतीय विमान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम

    Pushkar Singh Dhami : बंगालमध्ये मतदान करणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका; धामी म्हणाले- SIR मधून बनावट मतदार हटवल्याने दीदी घाबरल्या

    नितीश कुमार राज्यसभेत येऊन भाजपच्या मुख्य टीम मध्ये सामील, पण शरद पवार अजूनही “राखीव” खेळाडूच!!