• Download App
    दाभोलकर हत्या प्रकरणात तिघे निर्दोष; गोळ्या झाडणार्‍या दोघांना जन्मठेप; CBI च्या विशेष न्यायालयाचा निकाल!! Three acquitted in Dabholkar murder case; Life imprisonment for the two shooters

    दाभोलकर हत्या प्रकरणात तिघे निर्दोष; गोळ्या झाडणार्‍या दोघांना जन्मठेप; CBI च्या विशेष न्यायालयाचा निकाल!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात CBI च्या विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत तिघांना निर्दोष ठरवून प्रत्यक्षात गोळा झाडणाऱ्या दोन आरोपींना जन्म ठेवण्याची शिक्षा सुनावली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर हे गोळ्या झाडणारे आरोपी असून न्यायालयाने त्यांना यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आरोपी विरेंद्र तावडे, ऍड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. पावणे अकरा वर्षांनंतर दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. Three acquitted in Dabholkar murder case; Life imprisonment for the two shooters

    दोषींना शिक्षा झाली, त्याविषयी समाधान व्यक्त करून प्रत्यक्षात करत असणाऱ्यांना शिक्षा होऊन हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढवण्याची तयारी दाभोलकरांची मुले हमीद आणि मुक्ता यांनी केली आहे.

    20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 5 आरोपी होते. सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. दोन्ही हल्लेखोरांना न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

    डॉ. विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांवर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. पण त्यांची न्यायालयानं निर्दोष सुटका केली. त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणात हल्लेखोरांना शिक्षा झाली आहे, पण कट रचल्याचा आरोप असणाऱ्या तिघांची सुटका झाली आहे.

    दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे उलटल्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयानं डॉ. विरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर आरोप निश्चित केले. या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश नावंदर यांच्या बदलीनंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली.



    या खटल्यात ‘सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवत सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी नोंदवली.

    डॉ. दाभोलकर खून खटला घटनाक्रम

    • 20 ऑगस्ट 2013 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या.
    • पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
    • मे 2014 : पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे तपासाची सूत्रे
    • जून 2016 : सीबीआयकडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक.
    • सप्टेंबर 2016 : डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
    • ऑगस्ट 2018 : महाराष्ट्र एटीएस कडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक.
    • मे 2019 : व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून अटक; पुनाळेकर आणि विक्रम भावेची न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता
    • सप्टेंबर 2019 : दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली
    • सप्टेंबर 2021 : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणी अटक कलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित.
      आठ वर्षांनी २०२१ मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपींविरोधात खटला सुरू
    • 10 मे 2024 : सुमारे पावणे अकरा वर्षांनी डॉ. दाभोलकर खटल्याचा निकाल

    Three acquitted in Dabholkar murder case; Life imprisonment for the two shooters

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली