सेवानिवृत्त न्यायाधीशांनी पोलीस आयुक्त डी के ठाकूर यांना माहिती दिली असून गोमतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Threats to kill retired judge of Babri case, increased security at residence
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : बाबरी प्रकरणात विशेष न्यायाधीश पदावरून निवृत्त झालेले न्यायाधीश शेठ शैलेंद्र नाथ टंडन यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अनेक धमकीचे संदेशही पाठवण्यात आले आहेत. सेवानिवृत्त न्यायाधीशांनी पोलीस आयुक्त डी के ठाकूर यांना माहिती दिली असून गोमतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.टंडन यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गोमतीनगरच्या विरमखंड पाचमध्ये राहणारे न्यायाधीश शेठ शैलेंद्र नाथ टंडन यांना शुक्रवारी रात्री उशिरा एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. अपशब्द वापरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मग त्याच नंबरवरून मेसेजेसही पाठवले गेले.
गोमतीनगर निरीक्षक केशवकुमार तिवारी म्हणाले की, ज्या नंबरवरून कॉल करण्यात आला होता, तो नंबर बनावट आयडी वापरून खरेदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पाळत ठेवण्याच्या कक्षाच्या मदतीने अधिक तपास केला जात आहे.
Threats to kill retired judge of Babri case, increased security at residence
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला; दीड वर्षांपासून बंद आहे सेवा
- मुंबई महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेनेचा भगवा
- Ujjwala Yojana 2.0 ! पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उज्ज्वला योजना 2 चे लोकार्पण : मोफत स्टोव्ह ; LPG रिफिल ; कोट्यवधी नागरिकांना मिळणार फायदा
- Corona vaccine ; या आठवड्यात झायडस आणि सीरमच्या लसींना मिळू शकते तातडीच्या वापराची मंजुरी
- भारतातील परदेशी नागरिकांनाही मिळेल लस, सरकारने दिली मंजुरी, अशी असेल प्रक्रिया