• Download App
    हिंदू धर्माला धोका असल्याच्या बातम्या काल्पनिक केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण | 'Threats to hinduism is all imaginary' clarifies union home ministry

    हिंदू धर्माला धोका असल्याच्या बातम्या काल्पनिक केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी 

    दिल्ली : ‘हिंदू धर्माला कोणताही धोका नसून हिंदू धर्माला धोका असल्याच्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत’ असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. नागपूरमधील कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाऱ्याला प्रतिसाद देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील हिंदू धर्माला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी जबलपुरे यांनी आरटीआयद्वारे देशातील हिंदू धर्माला धोका असल्याचा पुरावा गृहमंत्रालयाकडे मागितला होता. आणि गृहमंत्रालयाकडे तो पुरावा आहे, असा त्यांनी दावा केला होता.

    ‘Threats to hinduism is all imaginary’ clarifies union home ministry

    एका महिन्यानंतर गृह मंत्रालयाचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी वी. एस. राणा यांनी हिंदू धर्माला कथित धमक्या संदर्भात कोणतीही माहिती किंवा पुरावा उपलब्ध नाहीये, असे स्पष्ट केले आहे. कोणत्या धर्माला किती धोका आहे? हे ओळखण्यासाठी गृहमंत्रालय अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे कोणतेही रेकॉर्ड ठेवत नाही. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय या बाबतीत पूर्ण माहिती देण्यासाठी सक्षम नाहीये असेही त्यांनी सांगितले आहे.


    Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!


    या उलट मोहनीश जबलापुरे हे व्यक्ती कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून ते सरकारविरोधी जाणूनबुजून बोलताना दिसून येत आहेत असे देखील गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.

    ‘Threats to hinduism is all imaginary’ clarifies union home ministry

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट