• Download App
    planes एका दिवसांत 50 हून अधिक विमानांना बॉम्बने

    planes : एका दिवसांत 50 हून अधिक विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

    planes

    दोन विमानांचे मार्ग बदलले; तपास यंत्रणा सतर्क


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : planes  भारतीय एअरलाइन्सच्या किमान 50 विमानांना रविवारी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. त्यातील दोन मार्ग वळवण्यात आले. 14 दिवसांत 380 हून अधिक फ्लाइट्सना अशा खोट्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रभावित होत आहेत.planes

    सर्वाधिक धमक्या इंटरनेटच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. अकासा एअरने सांगितले की त्यांच्या 15 फ्लाइट्सना सुरक्षा सूचना मिळाल्या आणि कसून तपासणी केल्यानंतर सर्व विमाने ऑपरेट करण्यासाठी योग्य असल्याचे आढळले.



    इंडिगोच्या 18 आणि विस्ताराच्या 17 फ्लाइटना धमक्या आल्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, धोक्यानंतर इंडिगोची किमान दोन उड्डाणे वळवण्यात आली. पुण्याहून जोधपूरला जाणारे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले आणि कोझिकोडहून दम्माम (सौदी अरेबिया) जाणारे विमान मुंबईकडे वळवण्यात आले.

    जोधपूर विमानतळावर लँडिंग करणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळण्याची गेल्या 10 दिवसांत ही चौथी वेळ आहे. हे विमान अहमदाबादमध्ये उतरवण्यात आले आणि सुरक्षा तपासणीनंतर ही धमकी बनावट असल्याचे आढळून आले.

    दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी विशाखापट्टणम येथे सांगितले की, केंद्र सरकार बॉम्बची खोटी धमकी देणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलत आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा आणि दंड करण्यात येईल.

    विशाखापट्टणम आणि विजयवाडा दरम्यानच्या दोन उड्डाणांचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नायडू म्हणाले की, या बनावट धमक्या रोखण्यासाठी सरकार आंतरराष्ट्रीय एजन्सी, कायदा अंमलबजावणी शाखा आणि इंटेलिजन्स ब्युरो यांची मदत घेत आहे. याशिवाय दोन नागरी उड्डयन कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचाही सरकार विचार करत आहे.

    Threat to destroy more than 50 planes in one day

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट