• Download App
    भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींना "सर तन से जुदा"ची धमकीthreat to BJP Minority Morcha president Jamal Siddiqui

    भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींना “सर तन से जुदा”ची धमकी

    • संघाच्या कार्यक्रमाला राहिले होते हजर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना त्यांच्या कार्यालयात जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. जमाल सिद्दीकी यांना आलेल्या धमकीच्या पत्रात “रसूल ए पाक की शान में सर तन से जुदा’ असे लिहिले आहे. threat to BJP Minority Morcha president Jamal Siddiqui

    जमाल सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरूदक्षिणा कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचा फोटो धमकी पत्रासोबत जोडला आहे. सिद्दीकी यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे नुकत्याच झालेल्या दंगलीत काही दंगेखोरांनी “रसूल ए पाक की शान में सर तन से जुदा’ हा नारा दिला होता. अशा 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    पाकिस्तानातून आला हा नारा

    पाकिस्तानमध्ये 2011 मध्ये पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांची त्यांचा अंगरक्षक मुमताज कादरी याने हत्या केली होती. सलमान तासीर यांच्यावर पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यावर टीका केल्याचा आरोप होता. सलमान तासीर यांच्या हत्येनंतर पाकिस्तानात अचानक राजकीय भूकंप झाला. त्याच वेळी खादिम हुसेन रिझवी मौलाना प्रसिद्धीच्या झोतात आला. या मौलानाने मुमताज कादरी यांना ‘गाझी’ म्हणून घोषित केले आणि त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण पाकिस्तानात लोक गोळा केले. त्याचवेळी त्यांच्या मिरवणुकांमध्ये घोषणा दिली. “गुस्ताख-ए-रसूल की एकही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’ या घोषणेने संपूर्ण पाकिस्तान आपल्या प्रभावाखाली घेतला होता. आपण अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही असे सिद्दिकी यांनी सांगितले.

    threat to BJP Minority Morcha president Jamal Siddiqui

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते