• Download App
    भारत जोडो यात्रेवर परदेशात पीएच डी; पण मूळात ती भारतातच का गडगडली?? Though some people pursue Ph.D. on bharat Jodo yatra in foreign countries, the impact of yatra is minimal in India

    भारत जोडो यात्रेवर परदेशात पीएच डी; पण मूळात ती भारतातच का गडगडली??

    भारत जोडो यात्रेवर परदेशात होतेय पीएच डी; Ph.D. पण ती मूळात भारतातच का गडगडली, असे विचारायची वेळ आली आहे. याला कारणच तसे घडले आहे. काँग्रेसचे एक प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत भारत जोडो यात्रेवर परदेशातील विद्यापीठांमध्ये काही लोक पीएच डी करण्याच्या विचारात असल्याचे बोलून दाखविले. भारत जोडो यात्रेचे त्यांनी विविध अंगांनी वर्णन केले. एक व्यक्ती निर्धाराने संपूर्ण भारतभर 4000 किलोमीटर चालते. भारत जोडते. हे कसे काय घडू शकते??, याचे परिणाम काय?? वगैरे विषयांवर परदेशांमधल्या विद्यापीठांमध्ये काही लोक पीएच डी करण्याचा विचार करत असल्याचे पवन खेडा म्हणाले आणि खरंच तसे घडणार असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे. कारण या निमित्ताने कोणी भारताचा अभ्यास करणार असेल, तर त्याला नाकारायचे कारण काय?? बिलकुलच काही कारण नाही!! Though some people pursue Ph.D. on bharat Jodo yatra in foreign countries, the impact of yatra is minimal in India

    पण मूळात इथेच तर खरी “राजकीय मेख” आहे, ती म्हणजे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर परदेशात पीएच डी होत असेल, तर मूळात त्या यात्रेचा खरा परिणाम ज्या प्रमाणात भारतात दिसायला हवा होता, तो का दिसला नाही??, काँग्रेसला अपेक्षित असणारे राहुल गांधींचे पॉलिटिकल “रि रि रि रि रि लॉन्चिंग” का घडू शकले नाही??, हे खरे प्रश्न आहेत!!

    … आणि खरंच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेकडे तटस्थपणे पाहिले, तर हे प्रश्न किती “जेन्युईन” आहेत, हे समजते. राहुल गांधी तब्बल 4000 किलोमीटर चालले हे खरेच. त्यांनी निर्धार दाखविला हेही खरेच. ते आणखीही काही हजार किलोमीटर चालणार आहेत… पण म्हणून त्या यात्रेचा परिणाम काँग्रेसला अपेक्षित राजकीय यश मिळवून देणार आहे का??, हा कळीचा सवाल आहे.

    अडवाणी – जोशींच्या यात्रा

    हे समजून घेण्यासाठी थोड्या जुन्या यात्रांचा संदर्भ देणे आवश्यक आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 1989 मध्ये सोमनाथ ते अयोध्या राम रथयात्रा काढली होती. त्यानंतर डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर तिरंगा यात्रा काढली होती. या दोन्ही यात्रांच्या वेळा आणि राजकीय संदर्भ वेगवेगळे होते. राम रथयात्रा साधारण 850 ते 900 किलोमीटरची होती, तर तिरंगा यात्रा ही साधारण 2500 – 3000 किलोमीटरची होती, पण या दोन्ही यात्रांनी भाजपसाठी जो राजकीय परिणाम साधून दिला तो अभूतपूर्व होता.

    लालकृष्ण अडवाणींनी राम रथयात्रा काढण्यापूर्वी लोकसभेत भाजपचे फक्त 2 खासदार होते, ते 1989 मध्ये 86 खासदार झाले होते. राम रथयात्रेमुळे भाजप संपूर्ण देशभर पसरला. संघटनात्मक पातळीवर मजबूत झाला. अयोध्येतील राम मंदिर निर्मिती हा राष्ट्रीय स्वरूपाचा भव्य दिव्य कार्यक्रम भाजपच्या कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी मिळाला. भाजपची राजकीय वाटचाल कित्येक वर्षे त्याच मुद्याभोवती फिरत राहिली आणि संघटनात्मक वाढ होत राहिली. आजही 2023 मध्ये भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून जिंकू शकतो, अशी उत्तर प्रदेशातली राजकीय स्थिती आहे. राम मंदिराचा मुद्दा आणि राम रथयात्रा भाजपसाठी राजकीयदृष्ट्या एवढा “क्लिक” झाला, की तेवढा कोणताच मुद्दा भाजपच काय अन्य कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने “क्लिक” झालेला दिसत नाही.

    86 वरून 161 वर

    त्यानंतर आली की 1992 ची तिरंगा यात्रा भाजपचे अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी हे त्या यात्रेचे नेतृत्व करत होते, तर त्या वेळचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र मोदी हे त्या यात्रेचे संयोजक होते. त्या यात्रेने देखील भाजपला एवढा मोठा परिणाम मिळवून दिला, की 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 161 खासदारांसह सर्वात मोठा पक्ष बनला. संघटनात्मक पातळीवर तो भारतात सर्वदूर पोहोचला. या दोन्ही यात्रांचे विशिष्ट नियोजन आणि त्यांचे हेतू हे राजकीय होते हे नि:संशय आणि ते कोणापासूनही लपवून ठेवण्याचे ही कारण नव्हते. तसे ते भाजपने ठेवलेही नाहीत आणि त्याचे परिणाम तर कोणापासून लपून लपून राहण्याची शक्यता नव्हती.

    या पार्श्वभूमीवर जेव्हा तुलनात्मक दृष्ट्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेकडे पाहिले जाते. त्यावेळी भाजपच्या तुलनेत काँग्रेसला मिळणारे यश हा मुद्दा थोडा बाजूला ठेवला तरी मुळात काँग्रेसला अपेक्षित असणारे यश तरी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे मिळेल का याची दाट शंका खुद्द काँग्रेस नेत्यांनाच आहे. आडवाणी, मुरली मनोहर जोशींच्या दोन यात्रा आणि राहुल गांधींचे भारत जोडो यात्रा यामध्ये कमालीचा गुणात्मक फरक आहे. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींच्या यात्रांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरला होता, त्याचा खरं म्हणजे मागमूसही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यात दिसत नाही.

    अन्यथा 3000 किलोमीटर चालून राहुल गांधींनी खरं म्हणजे मोदी सरकार विरुद्ध अक्षरशः देश पेटायला हवा होता. पण देश पेटला नाहीच, पण साधे रानही पेटले नाही. कर्नाटक मधल्या विधानसभा निवडणुकीतला विजय हा अपवाद वगळता काँग्रेसला भारत जोडो यात्रेमुळे फार कुठले मोठे यश मिळाल्याचे दिसत नाही. किंबहुना रस्त्यावर देखील त्याचा परिणाम फारसा दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.

    उलट भाजप संघटनात्मक पातळीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पातळीवर एवढा मजबूत झाला आहे, की राहुल गांधींनी 3000 किलोमीटर चालूनही त्यांच्यावर फारसा परिणाम झालेला दिसला नाही आणि हा खरा कळीचा मुद्दा आहे.

    मोदींची सत्ता हलायला तयार नाही

    अडवाणींच्या राम रथयात्रेनंतर राजीव गांधींची आणि त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांची सत्ता डळमळीत झाली, नव्हे उद्ध्वस्त झाली. तशी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर मोदींची सत्ता उध्वस्त होणे, तर दूरच पण साधी हालायलाही तयार नाही. अर्थात 2024 चे लोकसभा निवडणूक परिणाम यायचे आहेत, पण त्याच्या मत चाचण्यांचा अंदाज घेतला आणि त्यात 4 /5 टक्क्यांचा फरक गृहीत धरला तरी देखील मोदींच्या सत्तेला आव्हान देण्याइतपत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी ठरली, असे म्हणता येत नाही.

    म्हणूनच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भले परदेशांमध्ये अनेक लोक पीएच डी करणारही असतील, पण भारतात मात्र त्याचा परिणाम डळमळीतच राहिला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

    Though some people pursue Ph.D. on bharat Jodo yatra in foreign countries, the impact of yatra is minimal in India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!