विशेष प्रतिनिधी
मुंबई : घरगुती सिलेंडरचे भाव मोदींनी उतरवले पण काँग्रेसच्या पोटातले “गॅस” सुटले!!, असे आज घडले. Though Modi government decreased gas cylinder prices, Congress criticized it
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि गॅस सिलेंडरचे भाव 200 रुपयांनी उतरवले. उज्ज्वला योजनेतील गॅसवर 400 रुपये अनुदान मिळणार आहे. उद्याच्या रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधानांनी देशातल्या भगिनींना मोठी भेट दिल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पण सिलेंडरचे भाव उतरल्यानंतर काँग्रेसच्याच पोटातले “गॅस” सुटले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर टीका केली. या संदर्भात त्यांनी ट्विट केले. 400 रुपयांचा सिलेंडर 1100 रुपयांना विकून सरकारने देशातल्या 140 कोटी जनतेला आधीच लुटले आहे, पण आता निवडणुकीतली मते कमी होतील या भीतीने 200 रुपयांनी सिलेंडरचे भाव उतरवले आहेत. त्यामुळे गेल्या 10 वर्षांतली पापे धुतली जाणार नाहीत. जनतेला नुसता लॉलीपॉप देऊन चालणार नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पण मल्लिकार्जुन खर्गे हे ज्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्याच काँग्रेसने मध्य प्रदेशात 500 रुपयांत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली आहे. स्वतः खर्गे यांनीच सतना या गावातल्या सभेत ती घोषणा नुकतीच केली होती. राजस्थानातही महिलांना 500 रुपयात सिलेंडर देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 5 वर्षे सत्ता भोगल्यानंतर केली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मात्र 200 रुपयांनी सिलेंडरचे भाव कमी केले म्हणून काँग्रेसच्या पोटातले “गॅस” सुटून बाहेर आले आहेत.
Though Modi government decreased gas cylinder prices, Congress criticized it
महत्वाच्या बातम्या
- अरुणाचलच्या चीनच्या नव्या नकाशावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले…
- हवेत सोडून पुड्या; विरोधकांच्या गुडघ्याला मुंडावळ्या!!
- ”…आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा” आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा!
- जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार, निवडणुका कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर केंद्राने दिले उत्तर, म्हटले…