• Download App
    रामभक्तांवर ज्यांनी पूर्वी गोळ्या चालविल्या ते आता अयोध्येत दर्शनासाठी येताहेत, योगी आदित्यनाथ यांचा टोला|Those who used to shoot at Ram devotees are now coming to Ayodhya for darshan, says Yogi Adityanath

    रामभक्तांवर ज्यांनी पूर्वी गोळ्या चालविल्या ते आता अयोध्येत दर्शनासाठी येताहेत, योगी आदित्यनाथ यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी

     

    अयोध्या : अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी आंदोलन करणाºया रामभक्तांवर ज्यांनी पूर्वी गोळ्या चालविल्या तेच आता येथे दर्शनासाठी येत आहे, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. अयोध्या ही भारताची सांस्कृतिक राजधानी बनत असल्याचेही त्यांनी सांगितले.Those who used to shoot at Ram devotees are now coming to Ayodhya for darshan, says Yogi Adityanath

    अयोध्या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, अयोध्येमध्ये भव्य राममंदिराची उभारणी होत आहे ही जनतेची खरी ताकद आहे. आता जगातील कोणतीही शक्ती मंदिर उभारण्यापासून आपल्याला रोखू शकणार नाही.



    समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, यापूर्वी विकासकामांचा निधी कब्रस्थानातील भिंती बनविण्यासाठी खर्च केला जायचा. मात्र, आमच्या सरकारच्या काळात अयोध्येच्या विकासासाठी वापरला जात आहे. दोन सरकारच्या विचारधारांमधील हाच फरक आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनासारख्या भयंकर रोगाशी आपण लढत आहोत. या काळात गरीबांची पूर्णपणे काळजी घेतली गेली. उत्तर प्रदेशातील १५ कोटी गरीबांना पंतप्रधान योजनेद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. या योजनेतील सुरू असलेले अन्नधान्याचे वितरण होळीपर्यंत सुरू ठेवले जाणार आहे. याचबरोबर अंत्योदय कार्डधारकांना अन्नधान्यासोबत डाळ, मिठ, तेल आणि साखर यांचेही वाटप केले जाईल.

    Those who used to shoot at Ram devotees are now coming to Ayodhya for darshan, says Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो