• Download App
    हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाºयांचे हात कापले जातील, समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याचा इशारा|Those who try to touch the hijab will have their hands cut off, warns Samajwadi Party women leaders

    हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात कापले जातील, समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात कापले जातील असा इशारा समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबिना खानुम यांनी दिला आहे. कपाळावरील टिळा आणि पगडीची तुलना त्यांनी हिजाबशी केली आहे.Those who try to touch the hijab will have their hands cut off, warns Samajwadi Party women leaders

    अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीविरोधात निदर्शने केली. त्यावेळी खानुम बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भारताच्या मुली आणि बहिणींच्या सन्मानाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्यांना झाशीची राणी आणि रजिया सुलतानासारखे बनण्यास वेळ लागणार नाही.



     

    हिजाबवर हात घालणाऱ्यांचे हात कापले जातील. भारत हा विविधतेचा देश आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर टिळा किंवा पगडी किंवा हिजाब असला तरीही काही फरक पडत नाही.बुरखा आणि हिजाब भारतीय संस्कृती आणि परंपरांचे अविभाज्य भाग आहेत. या मुद्द्यांचे राजकारण करून वाद निर्माण करणे भयंकर आहे. सरकार कोणताही पक्ष चालवू शकतो, पण महिलांना कमकुवत समजण्याची चूक कोणीही करू नये, असे रुबिना खानुम यांनी सांगितले.

    हिजाब परिधान केल्यामुळे सहा मुस्लिम विद्यार्थिनींना उडुपी येथील महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर कर्नाटकात हिजाबचा वाद सुरू झाला. अनेक महाविद्यालये आणि शाळांनी समान आदेश जारी केल्याने ही समस्या राज्यभर पसरली. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याच्या विरोधात आणि समर्थनात आणखी निदर्शने सुरू केली. मुस्लिम मुलींचा विरोध करण्यासाठी मुलांनी भगवे स्कार्फ घातले होते. या प्रकरणावरून वाद आणखी वाढला आहे.

    Those who try to touch the hijab will have their hands cut off, warns Samajwadi Party women leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड