वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतावर जादा टेरिफ लादून दादागिरी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जोरदार टोला हाणला. सब के बॉस तो हम है!!, असे समजणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही, पण भारत वेगाने प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. जागतिक आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी ट्रम्प तात्यांना सुनावले.Those who believe that we are all bosses cannot tolerate India’s development; Rajnath Singh hits out at Trump!!
भारताच्या प्रगतीच्या गतीचे वर्णन करताना राजनाथ सिंह म्हणाले, जगात सगळीकडे अस्थिर वातावरण असताना भारताची अर्थव्यवस्था ब्राईट स्पॉट ठरली आहे. पण सब के बॉस तो हम है!!, असे समजून चालणाऱ्यांना भारताच्या विकासाची गती सहन होत नाही. भारतात आणि भारतीयांनी तयार केलेल्या वस्तू जगभरातल्या बाजारात स्वस्तात मिळता कामा नयेत, त्या महाग व्हाव्यात यासाठी काही “व्यवस्था” कामाला लागल्यात. भारताच्या वस्तू महाग झाल्या की त्यांना जागतिक बाजारात स्थान मिळणार नाही असे काही शक्तींना वाटते.Rajnath Singh
पण म्हणून भारताची आर्थिक प्रगतीची गती धीमी होणार नाही. भारताला रोखण्याची आता जगातल्या कुठल्याच शक्तीमध्ये ताकद नाही.
संरक्षण सामग्री क्षेत्रात भारत पूर्वी फक्त शस्त्रे, विमाने आणि अन्य सामग्री आयात करायचा. कारण भारतामध्ये या वस्तू बनायची शक्यता निर्माण केली नव्हती. 2014 च्या आधी भारत फक्त 600 कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्यात करायचा. पण भारत आता 24000 कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्यात करतो. आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे हे शक्य झाले.
Those who believe that we are all bosses cannot tolerate India’s development; Rajnath Singh hits out at Trump!!
महत्वाच्या बातम्या
- India Alliance इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सोमवारी काढणार मोर्चा
- महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!
- Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा
- Trump : ट्रम्प आर्मेनिया-अझरबैजानमधील 37 वर्षांचे युद्ध संपवणार; आतापर्यंत 6 युद्धे थांबवल्याचा दावा