वृत्तसंस्था
पाटणा : देशभरातील घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने छापे घालून कठोर कारवाई केली. तेव्हा त्याच्याविरुद्ध पीएफआय संघटनेच्या म्होरक्यांनी केरळ आणि महाराष्ट्रात मोठे आंदोलन केले. पुण्यामध्ये पीएफआयच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्याचा देशभर निषेध होत असताना बिहार मधून मात्र त्याच्या समर्थनार्थ लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद तिवारी पुढे आले आहेत. Those calling Pakistan Zindabad in Pune are supported by Lalu’s party in Bihar
पीएफआय समर्थकांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्याची पाठराखणच शिवानंद तिवारी यांनी केली आहे. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवानंद तिवारी म्हणाले, पीएफआय वर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा या त्या आंदोलनाचा एक भाग होत्या. पण म्हणून काही घोषणा देणारे लगेच सगळे काही पाकिस्तानी झाले नाहीत!!
आज एकीकडे लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकत्र येऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्याच वेळी लालूंच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांचे समर्थन करणे हा एक वेगळा राजकीय योगायोग घडला आहे.