विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद: उद्योजक पार्थिव ठक्कर यांनी आपल्या तीस वर्ष जुन्या असलेल्या मारुती ८०० कारच्या साह्याने आपला फकीरा बर्गर वाला हा व्यवसाय मे २०२० मध्ये सुरू केला. मूळचे अहमदाबादमधील पार्थिव यांनी २१ वर्षाचे असतानाच युनायटेड किंग्डम गाठले. युनायटेड किंग्डम मध्ये त्यांनी आपली दहा वर्षे काढली.
This US returned entrepreneur started his fakira Burgerwala business outside IIM Ahmedabad after his wife was diagnosed with cancer
युएस आणि यूके यांसारख्या देशांमध्ये पार्थिव यांनी प्रोफेशनल ड्रमर आणि सिंगर म्हणून काम केले. २०२० मध्ये पार्थिव यांच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यामुळे त्यांना भारतामध्ये परत यावे लागले.
बेटर इंडिया या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मी फक्त संध्याकाळी माझ्या शोजमध्ये व्यस्त असायचो त्यामुळे मी पबमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे असताना बर्गर, हॉट डॉग सारखे तेथील लोकप्रिय पदार्थ बनवायचे मी शिकून घेतले.” भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी काम सुधाकर सुरुवात केली. तो काळ पार्थिव यांच्यासाठी खूप दुर्दैवी काळ होता. त्यांच्या पत्नीवर उपचार चालू असतानाच कोवीड केसेसमध्ये वाढ होत चालली होती आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली गेली होती. त्यांच्या मुलीने त्यांना अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या समोर फुड स्टॉल सुरु करण्याचे सुचवले.
महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत उभारण्यासाठी हे ५ हिरो कार्य करीत आहेत
त्या काळात कार्यक्रम करता येत नसल्यामुळे पार्थिव यांनी दुसरा व्यवसाय चालू करण्याचे ठरवले. तेव्हा त्यांच्या भागात बर्गर विकले जात नसल्याचे त्यांना निदर्शनास आले. आणि एक वेगळा प्रकार म्हणून त्यांनी अमेरिकन आणि मेक्सिकन फास्ट फूड चा प्रयोग केला. त्यांनी त्यांच्या कारचा वापर केल्यामुळे जागेमध्ये करावी लागणारी गुंतवणूक वाचली.
सुरुवातीच्या काळात खरेदी केलेलं साहित्य त्यांना घरीच घेऊन जायला लागतं होते. हळूहळू सप्टेंबर २०२० पासून त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालू झाला. पार्थिव त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी त्यांच्या ग्राहकांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओना दिले. रोज १०० बर्गर विकत जात असले तरी त्यांचे असे म्हणणे आहे की, दर्ज्याशी तडजोड होता कामा नये. त्यामुळे मी या विक्रीतच समाधानी आहे. ते IIM-A च्या दारात ९ वाजता व्यवसाय चालू करतो आणि रात्री १० पर्यंत व्यवसाय चालू असतो. एक सहकारी त्यांना बँकेच्या व इतर कामांमध्ये मदत करतो. त्यांचे असे म्हणणे आहे की, भारतातील तरुण माझी व्यवसायाचे कौतुक करतात आणि प्रोत्साहन देतात. त्यामुळे मला याचा फायदा झाला आहे. ते पुढे म्हणतात की, मी माझ्या अमेरिकेतील जीवनाशी तुलना करू इच्छित नाही, पण मी स्वतःला सावरून एक नवीन मार्ग अवलंबला यात मला समाधान वाटते.
This US returned entrepreneur started his fakira Burgerwala business outside IIM Ahmedabad after his wife was diagnosed with cancer
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर हिंसाचार : ‘प्रियांका, मला माहिती आहे मागे हटणार नाहीस!’, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींचे ट्वीट
- वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय;
- लखीमपूर दुर्घटना : केंद्रीय मंत्र्यांचा मुलासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा झाला होता मृत्यू
- Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका
- AARYAN KHAN DRUGS CASE : Cruise Party मध्ये आर्यन खानने केलं होत ड्रग्सचं सेवन NCB