• Download App
    हे संस्कार आमच्या मुलावर नकोत ! बायजूसने थांबविल्या शाहरुख खानच्या जाहिराती|This rite is not on our child! Shah Rukh Khan's commercials stopped by Baijus

    हे संस्कार आमच्या मुलावर नकोत ! बायजूसने थांबविल्या शाहरुख खानच्या जाहिराती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशातील सर्वाधिक मोठी एडटेक स्टार्ट अप कंपनी बायजूस ने शाहरुख खानच्या सर्व जाहिरांतींवर बंदी आणली आहे. मुंबई येथील क्रुज पार्टी ड्रग्ज प्रकरणी आरोपी आर्यन खान याचे वडील शाहरुख खानला बायजूसने मोठा झटका दिला आहे. शाहरुख खान हा 2017 पासून बायजूसचा ब्रँन्ड अ‍ॅम्बेसेटर आहे.This rite is not on our child! Shah Rukh Khan’s commercials stopped by Baijus

    अग्रिम बुकिंग व्यतिरिक्त बायजूसने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. खानच्या स्पॉन्सरशिप डिल्समध्ये बायजूस हा सर्वाधिक मोठा ब्रँन्ड होता. या व्यतिरिक्त त्याच्याकडे ह्युंदाई, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिज्म सारख्या कंपन्यांच्या सुद्धा जाहिराती आहेत.



    बायजूस शाहरुख खानला 3 – 4 कोटी रुपये सुद्धा देत होती. अंमली पदार्थ प्रकरणी कोटार्ने आर्यन खान याचा जामिन फेटाळल्यानंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये पाठण्यात आले आहे. तसेच आर्यन खान याच्यासोबत अन्य 5 जणांनाही त्याच तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

    आर्यन खान याला एनसीबीने अटक केल्यावर अनेक मिम्स व्हायरल झाले होते. यामध्ये बायजूसचे नाव घेऊन असे संस्कार आमच्या मुलांना नकोत असे म्हटले होते. त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

    This rite is not on our child! Shah Rukh Khan’s commercials stopped by Baijus

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील