• Download App
    ही मुस्लिम महिला दहशतवादी बनलीय दंतकथा, तिच्या सुटकेसाठी आत्तापर्यंत गेलेत ५७ बळी|This Muslim woman has become a terrorist legend, 57 victims have killed so far for her release

    ही मुस्लिम महिला दहशतवादी बनलीय दंतकथा, तिच्या सुटकेसाठी आत्तापर्यंत गेलेत ५७ बळी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: अल-कायदा किंवा जैश-ए- मोहम्मद या संघटनांमध्ये महिलांचे प्रमाण खूपच कमी आहे. मात्र, मुस्लिम दहशतवाद्यांची राणी म्हणविल्या जाणाऱ्या महिलेची सुटका करण्यासाठी आत्तापर्यंत ५७ बळी गेले आहेत. आफियाच्या सुटकेसाठी पाकिस्तानात सतत निदर्शने होत असून पंतप्रधान इम्रान खानही तिच्या सुटकेसाठी प्रयत्नशील आहेत.This Muslim woman has become a terrorist legend, 57 victims have killed so far for her release

    टेक्सास येथील एका सिनेगॉगमध्ये ब्रिटीश-पाकिस्तानी असलेल्या मलिक फैसल अक्रम याने चार जणांना ओलीस ठेवले होते. अफगणिस्थानच्या बग्राम येथे कैदेत असलेल्या एका महिला दहशतवाद्याची सुटका करण्याची त्याची मागणी होती. ही महिला दहशतवादी म्हणजे आफिया सिद्दीकी. पाकिस्तानी वंशाची न्यूरोसायंटिस्ट. आफिया ही कराचीमधील डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या मोहम्मद सिद्दीकी यांची मुलगी. 1990 मध्ये किशोरवयात असतानाच तिला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यात आले.



    मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि ब्रँडीस विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. 1995 मध्ये तिचा कराचीतील डॉक्टर अमजद खान यांच्याशी विवाह झाला. एका वषार्नंतर या जोडप्याला अहमद नावाचा मुलगा झाला. मुस्लीम जगाशी संबंधित अमेरिकेत गेल्यानंतर आफिया सक्रीय झाली. विद्यार्थिनी असतानाच अफगाणिस्तान, बोस्निया आणि चेचन्यामधील घटनांवर तिने प्रचार सुरू केला. त्यांच्यसााठी निधी गोळा करायला सुरूवात केली.

    मशिदींमध्ये अनेक भाषणेही दिली. अमेरिकेत ९/११ चा हल्ला झाल्यावर फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिेशनचे (एफबीआय) तिच्याकडे लक्ष गेले. २००२ मध्ये आफिया आणि तिच्या पतीची सुमारे दहा हजार डॉलर्स किंमतीचे नाईट-व्हिजन गॉगल्स, बॉडी आर्मर आणि लष्करी स्वयं-सूचना पुस्तकांच्या खरेदीबद्दल चौकशी करण्यात आली. त्यानंतर हे जोडपे पाकिस्तानला परतले.

    मात्र, आॅगस्ट 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आफिया पुन्हा अमेरिकेला गेली. तेथे असताना तिने मुस्लिम दहशतवाद्यांशी काम करायला सुरूवात केली. इंडोनेशियातील बॉम्बस्फोटासाठी अल- कायदाच्या माजिद खान या दहशतवाद्याला तिने मदत केली. त्याच्यासाठी पोस्ट बॉक्स नंबर उघडले. त्यातून ५० हजार डॉलर्स जमा केले.

    त्यानंतर पुन्हा पाकिस्तानला गेल्यावर तिने ९/११ हल्याचा मास्टरमाईंड खालिद शेख मोहम्मदचा भाचा अममार अल-बलुचीशी लग्न केले. मार्च 2003 मध्ये खालिद शेख मोहम्मदला कराचीत अटक केली. त्यावेळी आफिया जैश-ए-मोहम्मदच्या मदतीने मोहम्मदच्या कुटुंबासह गायब झाली.

    त्यानंतर पाच वर्षांनी ती थेट अफगणिस्थानातील गझनीमध्ये सापडली. अफगाण पोलीसांनी तिला अयक केली. मात्र, चौकशीच्या वेळी तिने एका अमेरिकन सैनिकाने पायजवळ ठेवलेली स्वयंचलित रायफल हिसकावून घेून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी इतर सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आफिया गंभीर जखमी झाली. २०१० मध्ये अमेरिकन अधिकाºयाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आफियाला ८६ वर्षांची शिक्षा झाली.

    त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आफियाच्या तुरुंगातील छळाच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. मोअज्जेम बेग यांनी लिहिले आहे की अफगाणिस्तानच्या बग्राम तुरुंगात मला सतत एका महिलेच्या किंकाळ्या ऐकू यायच्या. इतर कैद्यांकडून कळले की त्यांनीही ओरडणे ऐकले होते.

    त्यानंतर पाकिस्तानातील इस्लामवाद्यांनी आफियाला जिवंत हुतात्मा बनवायला सुरुवात केली. 2010 मध्येच तिच्या शिक्षेच्या निकालाची बातमी आल्यावर लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि क्वेट्टाच्या रस्त्यावर हजारो निदर्शक उतरले. जमात-ए-इस्लामी या सर्वात मोठ्या इस्लामी पक्षाच्या नेत्यांनी अनेक रॅली काढल्या. तिच्या सुटकेसाठी प्रचार करण्यासाठी टेलीव्हिजन शो करण्यात आले.

    आफियाची बहीण आणि मुले त्यामध्ये सहभागी झाली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विविध इस्लामी राजकीय पक्ष आणि जिहादी गटांनी सिद्दीकी यांना मुक्त करण्यासाठी मोहि उघडली होती. मुस्लिम महिलांच्या सन्मानासाठी हा इस्लामचा संघर्ष आहे.

    त्यानंतर आफियाला मुक्त करण्यासाठी अनेक वेळा अपहरणे झाली. तिच्या अटकेचा बदला घेण्यासाठी अनेक हत्या घडविण्यात आल्या. तिला जीवंत हुतात्मा बनविण्यात आले. २०१९ मध्ये तर अमेरिकेला ओसामा बिन लादेनची ओळख पटविण्यासाठी मदत केलेल्या एका डॉक्टरच्या बदल्यात आफियाची सुटका करावी असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते.

    This Muslim woman has become a terrorist legend, 57 victims have killed so far for her release

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका