• Download App
    हा आहे योगी आदित्यनाथांचा नवा उत्तर प्रदेश,ऑपरेशन लंगडामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत This is Yogi Adityanath's new Uttar Pradesh, terror among criminals due to Operation Langada

    हा आहे योगी आदित्यनाथांचा नवा उत्तर प्रदेश,ऑपरेशन लंगडामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेश म्हणजे एकेकाळी सर्वाधिक गुन्हेगारीचे राज्य म्हणून ओळखले जात होते. यावर ‘मिर्झापूर’सारख्या वेब सिरीजही आल्या. मात्र, २०१७ पासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरुध्द कडक कारवाईचे धोरण आखले आहे. पोलीसांना नैतिक बळ देत उत्तर प्रदेश भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हा आहे नवा उत्तर प्रदेश असा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. आता ऑपरेशन लंगडाची चर्चा उत्तर प्रदेशात रंगली असून त्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत पसरल्याने धाक निर्माण झाला आहे. This is Yogi Adityanath’s new Uttar Pradesh, terror among criminals due to Operation Langada

    मुुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून अट्टल गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत पसरली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ऑपरेशन लंगडा असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून पोलिसांनी तब्बल साडेआठ हजार एन्काउंटर्स केले आहेत. त्यात तीन हजारांहून अधिक आरोपींवर गोळीबार करण्यात आला आहे. यापैकी १४६ जणांचा मृत्यू झाला असून, पायांवर गोळ्या घातल्यामुळे अनेकजण जायबंदी झाले आहेत. त्यामुळेच या मोहीमेला आॅपरेशन लंगडा असे म्हटले जाते.



    पोलीसांकडून आॅपरेशन लंगडा राबविले जात असल्याचे अधिकृतरित्या मान्य केले जात नाही. मात्र, गुन्हेगारांनी त्यातून संदेश घेतला आहे. पोलीसांना योगी आदित्यनाथ यांनी नैतिक बळही दिले आहे. उत्तर प्रदेश भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हा आहे नवा उत्तर प्रदेश असा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. गुन्हेगार कशा प्रकारे प्राणांची भीक मागत असल्याचे यातून दाखविण्यात आले होते. ही भीती चांगली आहे, असा संदेश भाजपने त्यातून दिला आहे.

    उत्तर प्रदेशात मार्च २०१७ मध्ये भाजपचे सरकार आल्यापासून ८४७२ चकमकींमध्ये ३३०२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर गोळीबार करण्यात आला. त्यात १४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जायबंदी झाले आहेत. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, चकमकींमध्ये जखमी झालेल्यांचा आकडा मोठा आहे. यावरून गुन्हेगारांना ठार मारणे हा हेतू नसल्याचे दिसून येते. त्यांना अटक करणे, हेच मुख्य लक्ष्य आहे. सरकारने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबिले आहे. गुन्हेगारांना आमच्यावर गोळीबार केला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. कायद्याने तसा अधिकार दिला आहे.

    गुन्हेगारांच्या हल्यात आत्तापर्यंत १३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ११५७ पोलीस जखमीदेखील झाले आहेत. त्यामुळे पोलीसांनी गुन्हेगारांविरुध्द मोहीम राबविली आहे.

    न्यायालयाने उत्तर प्रदेशात होत असलेल्या एन्काऊंटरवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा गुन्हेगारांना इशारे दिले आहेत. केवळ एन्काऊंटरच नव्हे तर गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करण्यात येत आहे. गोरगरीबांना लुबाडून गुन्हेगारांनी घेतलेल्या जमीनी परत देण्यात येत आहेत. त्यामुळे सामान्यांमध्ये पोलीसांबाबत विश्वास निर्माण झाला आहे.

    This is Yogi Adityanath’s new Uttar Pradesh, terror among criminals due to Operation Langada

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची