• Download App
    मोदी जगाची शेवटची आशा , ही बातमी खोटी असल्याचा न्यूयार्क टाइम्सचा खुलासा|This is a completely fabricated image, one of many in circulation featuring Prime Minister Modi. All of our factual reporting on Narendra Modi can be found at: nytimes.com

    मोदी जगाची शेवटची आशा , ही बातमी खोटी असल्याचा न्यूयार्क टाइम्सचा खुलासा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयार्क टाइम्सच्या पहिल्या पानावर, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’, असा फोटो छापून त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याबाबत अखेर न्यूयार्क टाइम्सनेच अधिकृतपणे खुलासा करत, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’ ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केले आहे. This is a completely fabricated image, one of many in circulation featuring Prime Minister Modi. All of our factual reporting on Narendra Modi can be found at: nytimes.com


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयार्क टाइम्सच्या पहिल्या पानावर, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’, असा फोटो छापून त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याबाबत अखेर न्यूयार्क टाइम्सनेच अधिकृतपणे खुलासा करत, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’ ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केले आहे.



    न्यूयार्क टाइम्सने त्यांच्या ट्विटरवर म्हटले आहे की, व्हायरल झालेल्या द न्यूयार्क टाइम्स या अमेरिकन दैनिकाचे पहिले पान असल्याचा दावा केला होता. रविवार, २६ सप्टेंबरला ते प्रसिद्ध झाल्याचेही सांगण्यात येत होते. तसेच या फोटोमध्ये सप्टेंबरचे स्पेलिंगही चुकीच्या पद्धतीने लिहिलेले होते. अखेर न्यूयार्क टाइम्सनेच खुलासा केल्यामुळे या व्हायरल झालेल्या खोट्या बातमीचा खुलासा झाला आहे.

    This is a completely fabricated image, one of many in circulation featuring Prime Minister Modi. All of our factual reporting on Narendra Modi can be found at: nytimes.com

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही