विशेष प्रतिनिधी
केरळ : सोन्या चांदीची हौस कुणाला नाहीये इथे? ह्या सोन्या चांदीच्या लोभापायी बरेच गुन्हे देखील घडलेले आपण पाहिले असतीलच. एखादा सण असेल, एखादा समारंभ असेल किंवा लग्नसोहळा असेल तर आपल्याकडे असेल नसेल तितके सोन्याचे दागिने अंगावर चढवून समारंभामध्ये आपली सोन्याची श्रीमंती मिरवणाऱ्या बायका तर प्रत्येक समारंभात हमखास भेटातातच.
This bride from Kerala wears ornaments made from coconut shell on her wedding day
सोन्याच्या मोहापायी हुंडा प्रथा चालू झाले आणि त्यानंतर बऱ्याच हुंडाबळीच्या दुखद घटना देखील घडलेल्या आहेत. भारतात बऱ्याच भागांमध्ये लग्नामध्ये सोनं वापरणं हे अतिशय प्रतिष्ठेचा मानले जाते. दक्षिणेकडे तर असं मानलं जातं की लग्नाच्या दिवशी मुलीची त्वचादेखील दिसू नये, इतकं सोनं तिच्या अंगावर असावं.
पण केरळमधल्या एलिझाबेथने या सर्व प्रथा परंपरेला आव्हान देत आपल्या लग्नादिवशी चक्क नारळाच्या शेल पासून बनवलेली ज्वेलरी परिधान केली होती. आणि खरंच सांगते तुम्हाला, या ज्वेलरीमध्ये ती अतिशय सुंदर आणि क्लासी दिसत होती.
नवरीने लग्नाच्या वेळी लाल किंवा हिरवीच साडी घालावी, असेच दागिने घालावेत, इतकं सोनं घालावे, मंगळसूत्र घालावे या सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारत एलिझाबेथने चक्क सोन्याचे दागिने घालायला नकार दिला होता. हे अतिशय कौतुकास्पदच आहे.
एलिझाबेथचे म्हणने असे नाहीये की सोन्याचे दागिने घालू नयेत. पण सोन्याच्या दागिन्यासाठी मुलीच्या आई वडिलांची होणारी हतबलता, हुंडा या सर्व प्रथांना तिचा विरोध आहे. म्हणून तिने आपल्या लग्नात नारळाचे दागिने घातले होते.
भारतातील बऱ्याच भागामध्ये सोन्यासाठी स्मगलिंग केले जाते. असे बरेच गुन्हे घडत असताना आपण पाहिले आहेत. तर एलिझाबेथने घेतलेला निर्णय अतिशय सुंदर होता. आणि हो एलिझाबेथचा जन्म वर्ल्ड कोकोनट डे दिवशी झाला होता.
This bride from Kerala wears ornaments made from coconut shell on her wedding day
महत्त्वाच्या बातम्या
- भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली
- Corona : कोरोनाचा वाढता आकडा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सापडले १६०० नवे रुग्ण
- WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार
- औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…