वृत्तसंस्था
काशी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा वाद चांगलाच पेटला असताना मशीद बांधण्याआधी याठिकाणी शिवाचे मंदिर असल्याचा दावा हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे. आता या दाव्याला पुष्टी देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. 30 सेकंदाचा हा व्हिडीओ या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरू शकणार आहे. This 30 second video is going to be important evidence in this case
ज्ञानवापी प्रकरण वेगळ्या वळणावर
या व्हिडिओत ज्ञानवापी मशिदीतल्या वजूखान्यात नंदी असल्याचे स्पष्ट दिसते आहे. वजूखाना आणि नंदी यांच्यासमोर एक लोखंडी जाळी आहे. यापूर्वी याच वजूखान्यात शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला होता. आता नंदीचे तोंड वजूखान्याच्या दिशेने असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
- ज्ञानवापीत शिवलिंग : अश्लील – अभद्र ट्विट करणाऱ्या दानिश कुरेशीला अटक; गुजरात पोलिसांची कारवाई
30 सेकंदाच्या या व्हिडिओने ज्ञानवापी प्रकरणात मोठी खळबळ उडाली असून ज्ञानवापी मशिदीतला वजूखाना प्रशासनाने सील केला आहे. इथे कुणालाही जाण्यास मनाई आहे. नंदीसमोर एक लोखंडी जाळी लावण्यात आली आहे.
या वजूखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ जवानांवर सोपवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी इथे शिवलिंग आढळून आल्याचा दावा करण्यात आला. आता इथे नंदी असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने ज्ञानवापी प्रकरण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.
This 30 second video is going to be important evidence in this case
महत्वाच्या बातम्या